ओडिसा: डीजेमुळे बहिरेपणा येऊ शकतो हे आपण आजवर ऐकलं असेल. पण डीजेमुळे चक्क आपल्या कोणाचा जीव गेल्याचं ऐकलं आहे का? डीजेच्या आवाजाने कोंबड्या मेल्याचा आरोप केला आहे. डीजेमुळे कोंबड्या मेल्याचा आरोप एका पोल्ट्रीमालकानं केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोल्ट्रीमालकाच्या तक्रारीचा मेसेज सध्या सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतोय. 'झी 24 तास'नं या मेसेजमागचं सत्य शोधण्याचा प्रयत्न केला. पार्टी असू द्या किंवा लग्नाची मिरवणूक, डीजेच्या तालावर सगळेच जण थिरकतात. 



आता हाच डीजे कोंबड्यांच्याही जीवावर ऊठू लागलाय का? असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण डीजेमुळे आपल्या कोंबड्या मेल्याचा आरोप एका पोल्ट्रीचालकानं केला. तसा मेसेज सोशल मीडियात व्हायरल होतो आहे.


ओडिसातील बालासोरमध्ये पोलिसांसमोर एक अभूतपूर्व प्रकरण आलं आहे. एका व्यक्तीनं लग्नादरम्यान मोठ्या आवाजात डीजे वाजवल्याबद्दल एका पोल्ट्रीचालकानं तक्रार नोंदवली आहे. 


डीजेमुळे त्याच्या 63 कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत निलागिरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या मेसेजमुळे नेटीझन्समध्ये खळबळ उडालीय. खरंच डीजेच्या आवाजामुळे कोबड्यांचा मृत्यू होऊ शकतो का? असा सवाल विचारला जातो आहे. 


झी 24 तासनं यामागचं सत्य शोधण्याचा प्रयत्न केला. ओडिशात पोल्ट्रीमालकानं दिलेली तक्रार खरी आहे. कोणताही मोठा आवाज माणसांप्रमाणेच पक्षी आणि प्राण्यांवर परिणाम करतो. 


डीजेचा आवाज हा साधारण आवाजापेक्षा कित्येकपट जास्त असतो. त्यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो. कोंबड्यांवर डीजेच्या आवाजाचा परिणाम झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.


तुम्ही डीजे वाजवताना पशू-पक्ष्यांची काळजी घ्या. मोठ्या आवाजाचा परिणाम केवळ माणसांवरच होतो असं नाही तर त्यामुळे प्राणी, पक्ष्यांनाही बाधा पोहचू शकते.