तुम्हालाही आलाय का नोकरीसाठी फोन? सावधान तुम्ही होऊ शकते अशी फसवणूक
अशी नोकरी मिळवणं तुमच्या अंगाशी येऊ शकतं, तुम्हालाही आलाय का नोकरीसाठी असा फोन?
नोएडा : बेरोजगार तरुण नोकरीच्या शोधात तर नोकरीत असलेले नोकरी बदलण्यासाठी पगार वाढण्यासाठी नव्या नोकरीच्या शोधात धडपड करत असतात. अशावेळी ऑनलाईन पद्धतीनंही नोकरी शोधण्यासाठी खटपट केली जाते. अनेक ठिकाणी अर्ज आणि माहिती दिली जाते.
काही फसवणूक करणारे याचाच फायदा घेतात. तुम्ही नोकरीसाठी कुठे ऑनलाइन अर्ज केला असेल आणि तुम्हाला कॉल आला तर सावधान. तुम्ही त्यांना सगळी चौकशी केल्याशिवाय कोणतीही माहिती देऊ नका. कारण तुमची फसवणूक होऊ शकते.
उत्तर प्रदेशातील नोएडा इथे बेरोजगार युवकांना फसवण्याचं एक रॅकेट पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. हे रॅकेट रोजगार हव्या असणाऱ्या तरुणांना फोन करून त्यांच्याकडून पैसे उकळायचे आणि नोकरीचं आमिष दाखवायचे.
पोलिसांनी या रॅकेटकडून दस्तऐवज आणि रोख रक्कम जप्त केली आहे. या रॅकेटमधील आरोपी तरुणांना गोड बोलून फसवायचे आणि त्यांना नोकरीचे आमिष दाखवायचे. याबदल्यात त्यांच्याकडून पैसेही उकळायचे. या रॅकेटचा पर्दाफाश करून पोलिसांना ताब्यात घेतलं आहे.
एका तरुणाने याची पोलिसात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी या रॅकेटचा पर्दाफाश केला. हे रॅकेटमधील लोकांनी गेल्या 6 महिन्यात वेगवेगळ्या तरुणांना अशा पद्धतीने फसवल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे तुम्हाला जर असे कॉल आले तर पूर्ण माहिती घेतल्याशिवाय कोणतीही माहिती देऊ नका.