Home Remedies For Rats:  स्वयंपाक घर, दुकान, हॉटेलमध्ये उंदरांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं आपण ऐकलं असेल. उंदीर धान्याची, भाज्यांची किंवा घरातील महत्त्वाच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणेही खराब करतात. उंदरांच्या त्रासाला कंटाळला असाल तर हे काही घरगुती उपाय आहेत ज्यामुळे उंदरांच्या त्रासापासून सुटू शकता. उंदरांपासून सुटका करण्यासाठी हे घरगुती उपाय खूप प्रभावी आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुरटी सर्वांना माहित आहे. तुरटीची बारीक पावडर तयार करा. गव्हाच्या पीठामध्ये तुरटीची बारीक पावडर मिक्स करून त्याचे लहान-लहान गोळे तयार करा. ज्या ठिकाणी उंदिर येतात त्या ठिकाणी ते गोळे ठेवा ते खाल्ल्याने उंदीर मरतात किंवा पळून जातात.
  
उंदरांपासून सुटका मिळवण्यासाठी बेकिंग सोडा आणि पेपरमिंटचीही मदत घेऊ शकता. यानंतर पेपरमिंट तेल आणि बेकिंग सोडा घाला. त्यानंतर या पिठाच्या गोळ्या बनवून घरात ज्या ठिकाणी उंदीर येतात त्या ठिकाणी ठेवा. या वासामुळे उंदराचा श्वास कोंडला जातो त्यामुळे ते तिथे थांबत नाहीत. 


उंदरांना पुदिन्याच्या पानांचा वास आवडत नाही. पुदिन्याची पाने घराच्या कोपऱ्यांमध्ये किंवा उंदिर ज्या ठिकाणी नासधूस करतात त्या ठिकाणी ठेवा. लसणाचा वासही उंदरांना सहन होत नाही. लसणाच्या कांड्या चिरून त्या उंदीर येतो त्या ठिकाणी ठेवा. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)