विराट-डिव्हिलियर्ससारखे मोठे खेळाडू या झाडाच्या लाकडापासून बनलेली बॅट वापरतात...कारण
मुलांना लहानपणी मिळणारी ही बॅट प्लास्टिक किंवा सामान्य लाकडापासून बनविलेली असते. परंतु लहानमुलं नेहमी टीव्हीवर मॅचमध्ये पाहातात की, त्यांचा आवडता खेळाडू आपल्या बॅटीने उंचच उंच शॅाट मारतो.
मुंबई : क्रिकेट हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. क्रिकेट हा ब्रिटनचा नॅशनल खेळ आहे. हा खेळ तसा इंग्रजांनी भारतात आणला, परंतु आता भारतात तो बराच लोकंप्रिय आहे. भारतीयांच्या क्रिकेटप्रेमाचे अनेक उदाहरणे सर्वांसमोर आहेत. तसेच क्रिकेटला भारतीयांनीच ख्याती मिळवून दिली यात काही शंका नाही. भारतीयांच क्रिकेटविषयीची आवड सांगणारे एक उदाहरण म्हणजे, तुम्ही पाहिले असाल की, 'प्रत्येक आई वडिल आपल्या मुलांना लहानपणी सर्वप्रथम बॅट खरेदी करुन देतात.' म्हणजे त्यांना ही आपल्या मूलाला क्रिकेट खेळताना पाहायचे असते. तर कधी काही मुलं स्वत: घरच्यांकडे बॅट मागतात यावरुन मुलांचंही क्रिकेटवरील प्रेम लक्षात येते.
मुलांना लहानपणी मिळणारी ही बॅट प्लास्टिक किंवा सामान्य लाकडापासून बनविलेली असते. परंतु लहानमुलं नेहमी टीव्हीवर मॅचमध्ये पाहातात की, त्यांचा आवडता खेळाडू आपल्या बॅटीने उंचच उंच शॅाट मारतो. तेव्हा बहुतेक लहानमुलं विचार करतात की, मला ही या खेळाडू सारखी किंवा या खेळाडूचीच बॅट हवी आहे. परंतु तुम्हाला माहित आहे या खेळाडूंची बॅट कुठे मिळते? किंवा ज्या लाकडापासून ही बॅट बनते तो कोणता लाकूड आहे ? तो लाकूड नक्की मिळतो तरी कुठे?
व्यावसायिक क्रिकेटमध्ये वापरल्या जाणार्या बॅट्स फक्त एकाच लकडाचे बनलेले असतात, ते म्हणजे विलो(Willow). या विलोचे दोन प्रकार आहेत. एक तर इंग्लिश विलो आणि दुसरे काश्मिरी विलो.
परंतु मोठे खेळाडू केवळ इंग्लिश विलोपासून बनवलेल्या बॅटचाच वापर करतात. काश्मिरी विलोपासून बनवलेल्या बॅटींपेक्षा इंग्रजी विलोपासून बनवलेल्या बॅट अधिक मजबूत आणि चांगल्या गुणवत्तेच्या असतात. हेच कारण आहे की, खेळाडू केवळ उच्च दर्जाच्या इंग्लिश विलोने बनवलेल्या बॅटचा वापर करतात.
सहाजिकच गुणवत्तेमुळे काश्मिरी विलो आणि इंग्लिश विलो बॅट्सच्या किंमतीहा वेगळ्या असणार, इंग्लिश विलोपासून बनलेली बॅट ही, काश्मिरी विलोपासून बनलेल्या बॅट्सपेक्षा खूप महाग आहे. इंग्रजी आणि काश्मिरी विलोमध्ये काय फरक आहेत हे जाणून घ्या. तसेच यामध्ये वापरलेले जाणारे विलो लाकूड कोठे सापडतात महिती करुन घ्या.
इंग्रजी आणि काश्मिरी विलोमधील फरक
इंग्रजी आणि काश्मिरी विलोमधील फरक जाणून घेण्यापूर्वी, विलोच्या काही विशेष गोष्टी जाणून घेणे फार महत्वाचे आहे. क्रिकेट बॅट बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विलोला सॅलिक्स अल्बा (Salix Alba) म्हणतात. सालिक्स अल्बा (Salix Alba) मोठ्या प्रमाणात युरोपमध्ये आढळतात, तसेच आशियातील काही भागात तो आढळतो. त्याची झाडे 10 मीटर ते 30 मीटर उंच असतात.
इंग्रजी विलोचा रंग काश्मिरी विलोच्या रंगापेक्षा फिकट आहे. इंग्रजी विलोमध्ये काश्मिरी विलोपेक्षा अधिक ग्रेन आहे, जे तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता. या व्यतिरिक्त दोघांच्या वजनातही मोठा फरक आहे. काश्मिरी विलोपेक्षा इंग्रजी विलो हलके आहेत. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे काश्मिरी विलोमध्ये अधिक घनता आणि ओलावा आहे. ज्यामुळे ती उचलताना जड लागते.