President of India: एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांची देशाच्या 15 व्या राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे. द्रौपदी मुर्मू 25 जुलैला राष्ट्रपतीपदाची शपथ घेतील. सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाल 24 जुलै रोजी संपत आहे. द्रौपदी मुर्मू या प्रतिभाताई पाटील यांच्यानंतर दुसऱ्या महिला राष्ट्रपती असणार आहेत. राष्ट्रपती हे देशातील सर्वोच्च पद आहे. राष्ट्रपतींना सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश शपथ देतात. आज देशाला नवा राष्ट्रपती मिळाला असून त्यांना काय काय सुविधा मिळतात? जाणून घेऊयात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रपतींना मिळणारं वेतन आणि सुविधा


  • राष्ट्रपती नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनमध्ये राहतात. राष्ट्रपती भवन 320 एकरमध्ये वसलं आहे. हे चार मजली भवन आहे. यात 340 खोल्या आहेत. राष्ट्रपती भवन परिसरात मुगल गार्डन आणि कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी घरं आहेत.

  • राष्ट्रपतींना 2018 पर्यंत प्रत्येक महिन्याला 1.50 रुपये वेतन मिळत होतं. मात्र 2018 पासून वेतन 5 लाख रुपये करण्यात आलं आहे. या व्यतिरिक्त राष्ट्रपतींना मोफत वैद्यकिय सुविधा, टेलिफोन बिल, घर, विजेसह काही भत्ते मिळतात.

  • राष्ट्रपतींना प्रवासाठी मर्सडिज बेन्झ एस 600 पुलमॅन गार्ड गाडी मिळते. राष्ट्रपतींकडे स्पेशल गार्ड असतात. त्यांची संख्या 86 इतकी असते.

  • राष्ट्रपती निवृत्त झाल्यानंतर त्यांना 2.5 लाख वेतन मिळतं. यासह बंगला, दोन मोबाईल आणि आजीवन मोफत वैद्यकीय सुविधा मिळतात.


राष्ट्रपतींचे अधिकार


  • राष्ट्रपती हे देशातील देशातील सर्वोच्च पद असून प्रथम नागरिक असतात. संविधानाच्या अनुच्छेद 72 अन्वये राष्ट्रपती एखाद्या गुन्ह्यासाठी दोषी ठरलेल्या व्यक्तीची शिक्षा माफ करू शकतात, निलंबित करू शकतात किंवा कमी करू शकतात. फाशीची शिक्षा झालेल्या दोषींबाबतही निर्णय घेऊ शकतो.

  • राष्ट्रपती भारताचे सरन्यायाधीश, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, राज्यपाल, निवडणूक आयुक्त आणि राजदूत यांचीही नियुक्ती करतात.

  • संविधानातील अनुच्छेद 352 अन्वये राष्ट्रपती युद्ध किंवा बाह्य आक्रमण किंवा सशस्त्र बंडखोरी झाल्यास देशात आणीबाणी घोषित करू शकतात.

  • जर एखाद्या राज्यात घटनात्मक यंत्रणा अपयशी ठरली असेल, तर राष्ट्रपती अनुच्छेद 356 चा वापर करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करू शकतात.