Plastic stools News : आपल्याला अनेक प्रश्न पडत असतात असं नाही तर लहान मुलांना खूप प्रश्न असतात. अनेक वेळा असं प्रश्न मुलं विचारतात की आपल्यालाच त्याची उत्तर माहित नसतात. आपण घरात वापरत असलेल्या वस्तूंबाबत कधी विचार केला नसेल असेही प्रश्न अनपेक्षित येतात. यात एक म्हणजे घरात आपल्याकडे प्लास्टिकचा स्टूल (Plastic stools) असतो. त्याला छिद्र (Hole) असते. मात्र, हे छित्र का असते, हे आपल्याला माहित नसते. मात्र, मुलांना याची खूप उत्सुकता असते. चला तर मग यामागचे कारण जाणून घेऊ.


स्टूलच्या पृष्ठभागावर गोलाकार छिद्र असते


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लहान मुलं अनेक वेळा कुटुंबातील एखाद्या सदस्याला हे असंच का? मग ते असं का? असे प्रश्न विचारुन भंडावून सोडतात. प्लास्टिकचे छोटे स्टूल (Plastic stools) अनेक घरांमध्ये असतात. अशा स्टूलच्या पृष्ठभागावर गोलाकार छिद्र असते. ते का असते. त्याचे कारण काय, याचा कधी विचार केला आहे का? मात्र, त्यासाठी शास्त्रीय कारण आहे.


 स्टूल उचलत असताना मदत होईल म्हणून, तर तसं नाही!


प्लास्टिकच्या वस्तू बनवणारे कारखाने असोत किंवा स्थानिक, त्या प्रॉडक्शनसाठी विज्ञानाच्या काही सामान्य नियमांचे पालन करीत असतात. स्टूल (Plastic stools) जगाच्या कोणत्याही भागात बनवला जात असला तरी त्याच्या मध्यभागी असे छिद्र असतेच. ते मुद्दाहून ठेवलेले असते. अनेकांना वाटू शकेल की स्टूल उचलत असताना मदत होईल म्हणून ते ठेवलेले असेल; पण हेच त्याचे कारण नाही. घर असो किंवा दुकान, अनेक ठिकाणी अशा प्लास्टिक स्टूल्सना एकावर एक ठेवले जात असते. जर या स्टूलच्या पृष्ठभागावर असे छिद्र नसेल तर हे स्टूल्स एकमेकांना चिकटतात. कारण त्यातील हवा बाहेर पडली तर ते एकमेकांत चिकटून राहतील आणि निघताना त्रास होऊ शकतो. त्यामुळे छित्र ठेवावे लागते. 


जर प्लास्टिक स्टूलसाठी छिद्र ठेवले नाही तर एअर प्रेशर आणि व्हॅक्यूममुळे त्यांना वेगळे करण्यासाठी मोठी ताकद लावाली लागेल किंवा त्यांना खेचून अलग करणे हे सोपे काम राहणार नाही. अशावेळी ते मोडण्याचा जास्त धोका असतो. अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी हे छिद्र बनवले जात असते. 


तसेच अन्यही काही कारणे यामागे असतात. जर एखादी अधिक वजनाची व्यक्ती स्टूलवर उभी राहिली तर स्टूल तुटू नये यामध्येही या छिद्राची भूमिका असते. तसेच प्रत्येक स्टूलमध्ये असे छिद्र बनवल्याने प्लास्टिकच्या सामग्रीची काही प्रमाणात बचतही होत असते.