उंदीर घरातील प्रत्येक वस्तू का कुरतडतात? ही त्यांची आवड असते की, नाईलाज?
बहुतेक लोक त्याकडे लक्ष देत नाहीत, तर काही लोक असे असतात जे या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात राहतात.
मुंबई : आपण उंदरांना गणपती बाप्पाचे वाहन मानतो. गणेशाच्या मुर्तीसोबत आपण त्यांची देखील पूजा करतो. परंतु तरीही आपल्याला आपल्या घरी उंदीर आजिबात आवडत नाहीत. कारण ते घरोघरी फिरतात, तसेच ते घाणीतून नाल्यांमधून वैगरे फिरतात. आपल्या घरी घाण करतात. तसेच घरांमध्ये उंदीर आल्याने ते सर्वत्र कचरा करतात.
तसेच ते आपल्या घरातील सर्व वस्तू कुरतडतात आणि खराब करतात, मग ती खाण्याची वस्तू असो, तुमचे कपडे असो किंवा पैसे सगळ ते कुडतडून टाकतात. परंतु तुम्ही कधी असा विचार केलात का? की उंदीर ज्या गोष्टींचे नुकसान करतात, त्या गोष्टी तो खात नाही तर फक्त कुडतडून ठेवतात. पण मग ते असे का करतात?
हा एक मोठा प्रश्न आहे आणि बहुतेक लोक त्याकडे लक्ष देत नाहीत, तर काही लोक असे असतात जे या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात राहतात. जर तुम्हाला देखील या प्रश्नाचे उत्तर हवे असेल तर आज आम्ही तुम्हाला याचे उत्तर देणार आहोत.
मानवांचे आणि उंदरांचे दात यात खूप फरक आहे. एका काळानंतर मानवी दातांची वाढ थांबते. म्हणजेच, ठराविक काळानंतर मानवी दातांच्या आकारात कोणताही बदल होत नाही. पण उंदरांचे दात आपल्या दातांपेक्षा बरेच वेगळे असतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, उंदरांचे दात नेहमीच वाढत असतात आणि याच कारणामुळे ते त्यांच्या दातांचा आकार नियंत्रणात ठेवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी कुरतडत राहतात.
जर उंदीर फक्त खाण्यासाठी दात वापरतील आणि इतर वस्तु कुरतडनार नाहीत, तर त्यांचे दात इतके मोठे होतील की, त्यांना तोंड बंद करता येणार नाही.
उंदराचे दात इतके मजबूत असतात की, ते भिंती, जमिनीवर आणि सिमेंटपासून बनवलेल्या इतर वस्तूं कुरतडतात. अशा परिस्थितीत, कागद, कपडे, लाकूड यासारख्या गोष्टींवर कुरतडणे हा उंदीरांसाठी डाव्या हाताचा खेळ आहे.
वेगवेगळ्या गोष्टीं कुरतडल्यामुळे उंदराचे दात झिजतात आणि यामुळे त्यांचे दात वाढू शकत नाहीत. तर आता तुम्हाला समजले असेल की तुमच्या घरात फिरणारे उंदीर तुमच्या वस्तूंवर का कुरतडतात आणि ते खराब करतात.