Why There is An Empty Space in the Middle of Blade: माणूस म्हटला की त्याला अनेक गोष्टींचं कुतुहूल असतं. याच जिज्ञासेतून अनेक गोष्टींचा शोध लागतो. पण काही गोष्टी कित्येक वर्ष आपल्या समोर असतानाही त्याच्यासंबंधी आपल्याला प्रश्न पडत नाहीत. मात्र यामागे अनेकदा काहीतरी भन्नाट कारण असतं. अशीच एक दैनंदिन वापरातील गोष्ट म्हणजे ब्लेड. हे ब्लेड पाहिल्यानंतर त्याचं डिझाईन नेमकं असं का आहे याचा विचार कधी तुम्ही केला आहे का? म्हणजे त्याच्या मधोमध भागी मोकळी जागा का असते यामागील कारण तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही पाहिलं असेल तर ब्लेड कोणत्याही कंपनीचं असलं तरी त्याचं डिझाईन सारखंच असतं. तुम्ही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात गेलात तरी ब्लेडच्या मधोमध मोकळी जागा असल्याचं तुम्हाला पाहायला मिळेल. पण ही मोकळी जागा ठेवण्याचं कारण काय असतं? याचा काय फायदा होतो? यामागे कोणताही योगायोग नाही, तर एक कारण लपलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात यामागील कारण. 


फक्त शेव्हिंगसाठी ब्लेडचा वापर


1901 मध्ये सर्वात प्रथम किंग कँप जिलेटने विलियम निकर्सनच्या मदतीने ब्लेड तयार केलं होतं. Gillete कंपनीने या ब्लेडचं पेटंटही घेतलं आणि 1904 पासून त्याची निर्मिती सुरु केली. त्यांनीच याचं डिझाईन तयार केलं होतं. यादरम्यान ब्लेडचा वापर फक्त आणि फक्त दाढी करण्यासाठी केला जात होता. यामुळे याचं डिझाईन अशापद्दतीने करण्यात आलं होतं की रेजरचे बोल्ट त्यात फिट बसतील. याच कारणास्तव त्याच्या मधोमध मोकळी जागा ठेवण्यात आली होती. त्यावेळी मार्केटमध्ये Gillete वगळता कोणतीही स्पर्धक कंपनी नव्हती. 


शेव्हिंग रेज़रमुळे डिझाईन बदलणं शक्य नव्हतं 


ब्लेडच्या व्यावसायातून नफा होत असल्याचं लक्षात येताच अनेक कंपन्या मार्केटमध्ये स्पर्धेत उतरल्या होत्या. मात्र त्यावेळी फक्त Gillete शेव्हिंग रेजरची निर्मिती करत होतं. त्यामुळे कोणतीही कंपनी असली तरी त्यांना ब्लेडचं डिझाईन बदलणं शक्य नव्हतं. 


सध्या दिवसाला 10 लाखांहून अधिक ब्लेड तयार केले जातात. सध्या मार्केटमध्ये युज अॅण्ड थ्रो डिझाईन आले आहेत. पण तरीही ब्लेडचं डिझाईन मात्र बदललेलं नाही.