इंदौर : सरकारी हॉस्पिटल्समध्ये डॉक्टर कधी वेळेवर भेटत नाही... या तक्रारीला छेद देत मध्य प्रदेशातील एका डॉक्टरने एक आदर्श समोर ठेवला आहे. आपल्या पेशाशी अत्यंत प्रामाणिक राहत या डॉक्टरने जवळजवळ ११ वर्ष सुट्टी घेतलेली नाही. गोविंदवल्लभ पंत जिल्हा रुग्णालयात शव परीक्षण विभागाचे इन्चार्ज डॉ. भरत वाजपेयी यांनी सांगितले की, "रुग्णायलात शव परीक्षण विभाग नोव्हेंबर २००६ मध्ये सुरु झाले. तेव्हापासून आतापर्यंत मी सुट्टी न घेता अखंड काम करत आहे. आतापर्यत मी सुमारे ९००० पोस्टमॉर्टम केले आहेत."


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याचबरोबर ते म्हणाले की, "मृत्यू न झाल्यास सण साजरे करायला मिळतात. गेल्या काही वर्षात असे काही दिवस होते की, त्यांच्या टीमने जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने रात्री देखील काम केले आहे."


वाजपेयी यांच्या रेकॉर्डबद्दल विचारणा केली असता जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ. मधुसूदन मंडलोई यांनी सांगितले की, "सरकारी रेकॉर्ड तपासल्यानंतरच मी यासंदर्भात काही बोलू शकेन." मात्र या ५७ वर्षीय डॉक्टरांनी बिना सुट्टी काम केल्याबद्दल २०१५ मध्ये लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्मध्ये या रेकॉर्डची नोंद झाली आहे. त्यांच्या या योगदानाबद्दल प्रदेश सरकारने देखील त्यांना सन्मानित केले आहे.