नवी दिल्ली : केंद्र सरकारनं आणलेल्या एनएमसी विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी आज दिल्लीत देशभरातल्या आयुष डॉक्टरांनी आंदोलन केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अॅलोपॅथीच्या डॉक्टरांनी सरकारच्या नव्या कायद्याला विरोध केला. वैकल्पिक उपचार पद्धतीनं उपचार करणाऱ्या डॉक्टरांना एक छोटा अभ्यासक्रम पूर्ण करून, अॅलोपॅथीची प्रॅक्टीस करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. या तरतूदीला अॅलोपॅथी डॉक्टरांचा विरोध आहे.


तर एनएमसी विधेयकाच्या विरोधात 'फेडरेशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर असोसिएशन'नं निदर्शनं केली. आरोग्य क्षेत्रात शॉर्ट कट करता येणार नसून या विधेयकामुळे आरोग्य व्यवस्था आणखी कमकुवत होणार असल्याचा दावा असोसिएशन तर्फे करण्यात आलाय.