COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Instagram Viral Video : पाणीपुरीचं (PaniPuri video) नाव घेतलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. पाणीपुरी खायला पाणीपुरी प्रेमी कधी पण एका पायावर तयार असतात. आंबट-गोड पाणी...एकदा खाल्लं की तुम्हाला चटक लागलीच पाहिजे...माणसाप्रमाणे प्राण्यांना पाणीपुरीचं वेड लागलेलं आपण पाहिलं आहे. गाय - वासरु, हत्तीने पाणीपुरीवर ताव मारतानाचा व्हिडीओ आपण सोशल मीडियावर (viral on social media) पाहिले आहेत. गाय - वासरु, हत्तीनंतर अजून एका प्राण्याला (animals video) पाणीपुरीची चटक लागली आहे. 


गप्पागप्प पाणीपुरी खाताना व्हिडीओ


सोशल मीडियावर व्हायरल होतं असलेल्या या व्हिडीओमध्ये एक महिला क्यूट अशा श्वानला (Dog video) कडेवर घेऊन पाणीपुरी स्टॉलवर उभे आहे. तुम्ही या व्हिडीओमध्ये श्वानची पाणीपुरी पार्टी पाहू शकता. हा श्वान अख्खी पुरी एका घासात फस्त करतो. या क्यूट श्वानला असं पाणीपुरीवर ताव मारताना नेटकऱ्यांना तुफान आवडतं आहे.  (Dog eating panipuri video viral on social media Instagram nmp )



हेही वाचा -  Trending Video : गायीनंतर आता हत्तीदेखील पाणीपुरीच्या प्रेमात, Video पाहून व्हाल अवाक्


व्हिडीओ व्हायरल 


हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म dheerajchabbra's या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.



या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता श्वान अगदी पाणीपुरीच्या पाणीवरही चटकारे मारत मारत आनंद घेतोय. 


हेही वाचा - Trending Video: पाणीपुरी विक्रेते पती-पत्नी जिंकतायत लाखो लोकांचं मनं...



हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिला जातो आहे. काही नेटकऱ्यांना हा व्हिडीओ आवडला आहे तर काही नेटकऱ्यांनी टीका केली आहे.