Dog Free State In India : भारत देश विविधतनेने नटलेला देश आहे. संस्कृती, निसर्गसौंदर्य, खाद्यसंस्कृती, विशिष्ट प्रकारच्या चालितीरी, पेहराव यासह विविध कारणांमुळे भारतातील प्रत्येक राज्य हे वैशिष्ट्यपूर्ण ठरते. मात्र, भारतातील एक राज्य विशिष्ट कारणामुळे वेगळे ठरते. हे कारण म्हणजे एक श्वान नसलेले हे भारतातील एकमेव राज्य आहे. जाणून घेऊया भारतातील हे राज्य कोणते?


हे देखील वाचा...5,62,51,58,48,05,00,000 एवढी संपत्ती गायब! भारताला कुणी आणि कसं लुटलं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात एकूण 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. प्रत्येक राज्य वेगवेगळ्या कारणामुळे लोकप्रिय आहे. भारतात सर्वत्र कुत्रा हा प्राणी दिसतो. अनेकजण कुत्रा पाळतात देखील. मात्र, भारतात एक असे राज्य आहे. जिथे कुत्रा हा प्राणी पहायलासुद्धा मिळणार नाही. या राज्याचे नाव आहे लक्षद्वीप (Lakshadweep).  येथे कुत्रा हा प्राणी का दिसत नाही यामागचे कारण खूपच रंजक आहे. 


भारतातील लक्षद्वीप हे थेट मालदीवला (Maldives) टक्कर देते. लक्षद्वीप हे भारतातील एक सुंदर बेट आहे. येथील अथांग समुद्र किनारे आणि निसर्गसौंदर्या पाहण्यासाठी  फक्त देशातूनच नव्हे तर जगभरातून पर्यटक येथे फिरण्यासाठी येतात. लक्षद्वीपमध्ये मांजर आणि उंदीर तुम्हाला हमखाम पहायला मिळतील. मात्र लक्षद्वीपमध्ये कुत्रा हा प्राणी तुम्हाला कुठेही दिसणार नाही. इतकचं नाही तर, पाळीव कुत्र्यांना सोबत घेऊन येणाऱ्या पर्यटकांना येथे प्रवेश दिला जात नाही. 


36 लहान बेटांनी बनलेल्या लक्षद्वीपची एकूण लोकसंख्या सुमारे 64000 आहे. लक्षद्वीपमध्ये 32 बेटे असूनही. येथील फक्त दहा बेटांवर लोक राहतात. ज्यामध्ये कावरत्ती, अगत्ती, अमिनी, कदम, किलातन, चेतलाट, बित्रा, अंदोह, कल्पना आणि मिनीकॉय यांचा समावेश आहे. यापैकी अनेक बेटे आहेत जिथे 100 पेक्षा कमी लोक राहतात. कावरत्ती ही  लक्षद्वीपची राजधानी आहे. लक्षद्वीपमध्ये माशांच्या 600 हून अधिक प्रजाती आढळतात.


जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, लक्षद्वीप हे रेबीज मुक्त राज्य आहे. सरकारने लक्षद्वीपमध्ये पाळीव आणि बिगर पाळीव कुत्रे नेण्यास बंदी घातली आहे. येथील लोकांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक श्रद्धेमुळे कुत्र्यांची पैदास तसेच पालन केले जात नाही. बेटावर कुत्रे नसल्यामुळे वातावरण स्वच्छ आणि शांत राहण्यास मदत होते.