Dog Volleyball Viral Video: सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ व्हायरल होत असतो. यात प्राण्यांचे व्हिडीओ वेगाने व्हायरल होतात. विशेषत: कुत्र्या-मांजरींशी निगडीत व्हिडीओंना सर्वाधिक पसंती मिळते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोकांची पसंती मिळत आहे. यात काही कुत्रे एका शेतात एकत्र वॉलीबॉल खेळताना दिसत आहेत. एकाच जातीचे अनेक कुत्रे शेतात खेळत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वॉलीबॉल खेळताना प्रत्यक्ष दोन टीम नसल्या तरी काही कुत्रे काळे-पांढऱ्या रंगाचे आहेत, तर काही कुत्रे तपकिरी-पांढऱ्या रंगाचे आहेत. त्यामुळे दोन टीम खेळत असल्याचं दिसत आहे. वॉलीबॉल खेळताना कुत्रे गुलाबी फुग्याच्या मागे धावताना दिसत आहेत. सर्व कुत्र्यांना फुगा पकडण्याची घाई आहे. काही कुत्रे उंच उडी मारून नाकाने फुग्यावर जोरात मारतात आणि फुगा हवेत उंच उडवतात. तर काही कुत्रे पुन्हा एकदा फुगा पकडण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत. कुत्र्यांच्या वॉलीबॉलमुळे नेटकऱ्यांचं चांगलंच मनोरंजन होत आहे. नेटकरी वेगवेगळ्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करत आहे.



फुगा हवेत उडवण्यासाठी कुत्र्यांमध्ये चढाओढ दिसून येते. अवघ्या काही सेकंदांच्या या व्हिडीओ 76 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर एक लाखाहून अधिक लोकांनी त्याला लाइक केले आहे.