Dogs Waiting For School Bus: सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो. यामध्ये पाळीव प्राण्यांच्या व्हिडीओंना सर्वाधिक पसंती मिळते. कारण कुत्रा हा मनुष्याचा जवळ राहणारा प्राणी आहे. त्यामुळे कुत्र्यांच्या व्हिडीओंना (Dog Viral Video) सर्वाधिक पसंती मिळते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये कुत्र्यांचा अंदाज पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. कुत्रे लहान मुलांसारखे स्कूल बसची वाट पाहताना दिसत आहेत. विशेष म्हणजे एका पाठोपाठ एक असे रांगेत उभे असताना दिसत आहेत. पाठीवर स्कूल बॅग आणि गळ्यात पिवळ्या रंगाचा स्कार्फ घातलेला दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल व्हिडीओमध्ये दहा कुत्र्यांचा एक गट बसची वाट पाहताना दिसत आहे वेगवेगळ्या जातीचे कुत्रे एका कार्पेटवर बसलेले दिसत आहेत. ट्विटरवर Buitengebieden नावाच्या युजर्सने हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "कुत्रे स्कूल बसची वाट पाहात आहेत"  व्हिडीओसाठी victoriadw619 नावाच्या युजरला श्रेय देण्यात आलं आहे. हा व्हिडीओ 2.6 दशलक्षहून अधिक वेळा पाहिला असून 83 हजारांहून जास्त लाईक्स मिळाले आहेत. 6,500 हून अधिक वापरकर्त्यांनी पोस्ट रिट्विट केले आहे. तर अनेकांनी व्हिडीओखाली आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. 



एका यूजरने लिहिले की, 'त्या कुत्र्यांच्या गोंडस बॅग पाहा.' दुसर्‍या युजरने लिहिले की, 'आश्चर्यकारक आहे की त्यांनी पिवळा स्कार्फ कसा घातला आहे. तिसऱ्या यूजरने लिहिले की, 'कुत्रे नेहमी माणसांचे ऐकतात, त्यांना फक्त प्रशिक्षित करण्याची गरज आहे.'