पोपट पिटेकर, झी मीडिया, मुंबई : देशात सीएनजी वाहनांचे ग्राहक वाढत आहेत. महागड्या पेट्रोल-डिझेलच्या जमान्यात मायलेजसाठी लोक सीएनजी कारला (cng car) प्राधान्य देत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, सीएनजी वाहनांना अतिरिक्त काळजी घ्यावी लागते. तसेच सीएनजी कार चालकांनीही जास्त काळजी घ्यावी. एका ग्राहकाने आपल्या सीएनजी वाहनात गॅस भरला आणि तेथून निघू लागला. पेट्रोल पंपापासून सुमारे 50 मीटर अंतरावर वाहनातून धूर येऊ लागला आणि बघता बघता त्याला आग लागली. आग इतकी भीषण होती की चालकाने कारमधून उडी मारून आपला जीव वाचवला. सुदैवाने आगीचा भडका सीएनजी पंपापर्यंत गेला नाही, अन्यथा मोठी दुर्घटना (Big accident) घडू शकली असती. त्यामुळे सीएनजी भरताना योग्य ती खबरदारी घ्या. (cng car maintenance tips)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाहन बंद करुन CNG भरा
जेव्हा तुम्ही भरता तेव्हा सर्वप्रथम वाहन बंद (Turn off the vehicle) करा. कारण चालू इंजिनमध्ये आग लागण्याचा मोठा धोका असतो. त्यामुळे गाडी थांबवा आणि त्यातूनही बाहेर पडा. त्यानंतर सीएनजी भरा.


गाडी जवळ धूम्रपान करु नका
CNG भरत असताना आसपासच्या परिसरात धूम्रपान करू नका, कारण सीएनजी हे एक ज्वलनशील इंधन (Combustible fuel) आहे जे अगदी थोड्याशा ठिणगीने पेट घेऊ शकतं. त्यामुळे जर कोण धूम्रपान करत असेल तर त्याला पंपाच्या बाहेरच थांबायला लावा. त्या व्यक्तिच्या एका चुकीमुळे मोठी दुर्घटना घडू शकते.


अग्निशामक यंत्र
सीएनजी कारमध्ये (cng car) नेहमी अग्निशामक यंत्र (Fire extinguisher) ठेवा. पेट्रोल आणि डिझेल कारच्या तुलनेत सीएनजी कारला आग (CNG car on fire) लागण्याची शक्यता जास्त असते. अशा परिस्थितीत अग्निशमन यंत्राद्वारे आपत्कालीन परिस्थितीत तुम्हाला मदत होऊल. वरील सर्व गोष्टीची काळजी घेतली तर नक्कीच सीएनजी भरताना होणारे दुर्घटनांपासून तुम्ही वाचू शकता त्यामुळे जीवितहानीही होणार आहे.