मुंबई : Dolo 650 Sale: गेल्या एका वर्षात डोकेदुखी, अंगदुखी आणि ताप यापासून आराम मिळण्यासाठी तुम्ही कोणती गोळी वापरली आहे? आठवत नसेल तर हरकत नाही. तुम्हाला तुमच्या मनावर जास्त ताण देण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही कोणती गोळी वापरली असेल. एकतर तुम्ही क्रोसिन किंवा डोलो 650 घेतली असेल. या काळात संपूर्ण भारताने कोणती गोळी वापरली तर त्यावर एकच उत्तर आहे. ते म्हणजे Dolo 650.  गेल्या एका वर्षात सर्वाधिक वापरला जाणारा टॅबलेट बनली आहे.


Dolo 650 ने मार्च 2020 पासून 567 कोटी रुपये कमावले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मार्च 2020 पासून 567 कोटी रुपयांच्या डोलो 650 टॅब्लेटची विक्री झाली आहे. एवढेच नाही तर या गोळीला कोरोनाच्या काळात आवडता 'स्नॅक' म्हटले जात आहे. एका वर्षात त्याची इतकी विक्री झाली की गेल्या आठवड्यात #Dolo650 सोशल मीडियावर मेम फेस्टमध्ये ट्रेंड करत होता. या काळात ही गोळी इतकी का वापरली गेली, डॉक्टरांनी ही गोळी रुग्णांसाठी एवढी का लिहिली? असे प्रश्न सगळ्यांना पडत आहे. 


जानेवारी 2020 पासून पॅरासिटामोलची विक्री पाहता, हे लक्षात येतं की Dolo 650 विक्रीच्या बाबतीत अव्वल आहे. विक्रीच्या बाबतीत कल्पोल आणि सुमो एल दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. भारतात पॅरासिटामोलचे ३७ ब्रँड आहेत.


ज्यांची विक्री देशातील विविध प्रदेशांमध्ये सर्वाधिक आहे. Dolo 650 ची निर्मिती बंगळुरू येथील मायक्रो लॅब्स लिमिटेडद्वारे केली जाते. दुसरीकडे, जीएसके फार्मास्युटिकल्स कॅल्पोलचे उत्पादन करते आणि या दोन्ही गोळ्या सामान्यतः डॉक्टर रुग्णांसाठी लिहून देतात.


डोलो 650 ने डिसेंबरमध्ये 28 कोटींची विक्री 


डिसेंबर 2021 मध्ये डोलो 650 ने 28.9 कोटी रुपयांची विक्री केली. जी मागील वर्षी याच महिन्यातील विक्रीपेक्षा 61.45 टक्के अधिक होती. परंतु त्याची सर्वाधिक विक्री एप्रिल-मे 2021 मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान झाली होती. एप्रिलमध्ये त्याच्या विक्रीने 48.9 कोटी कमावले तर मेमध्ये 44.2 कोटी रुपये कमावले.