मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव पाहता आंतरदेशीय उड्डाणं देखील रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मंगळवारी रात्री १२ पासून उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. कार्गो विमानांवर बंदी घालण्यात आलेली नाही. मंगळवारी रात्री १२ पर्यंत विमानांना लँडिंग करण्याची योजना आखावी लागेल. रेल्वे सेवा याआधीच बंद करण्यात आली आहे. कोरोना महामारीमुळे आता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात रोज ६५०० विमानांचं उड्डाण होत होतं. विमानातून प्रत्येक वर्षी १४४.१७ मिलियन प्रवाशी प्रवास करतात. पण देशात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता सरकारने गंभीर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे देशात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ४३४ वर गेली आहे. २४ तासात ५० नवे रुग्ण आढळले आहेत तर ४ जणांचा मृत्यू झाला आहे.


दिल्ली, राजस्थान, बिहार, पंजाब, उत्तराखंड, छत्तीसगड, झारखंड, जम्मू-काश्मीर, तेलंगणा, आंध्र प्रदेश, नागालँड, अरुणाचल प्रदेश मध्ये कोरोनामुळे ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन आहे. उत्तर प्रदेशच्या १६ जिल्ह्यांमध्ये २५ मार्चपर्यंत लॉकडाऊन असणार आहे.


इंडियन रेल्वेने ३१ मार्चपर्यंत लांब पल्ल्यांच्या गाड्या आणि लोकल सेवा ही बंद केली आहे. ज्यांनी या दरम्यान तिकीट बुकींग केली होती अशा लोकांना रिफंड देण्यात येणार आहे.