नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा मोदींची नक्कल करत त्यांचे कौतुक केले आहे. हार्ले डेव्हिडसन कंपनीच्या दुचाकी आयात करण्यासाठी भारतात लावण्यात येणाऱ्या कराबाबत बोलत असताना त्यांनी ही नक्कल केली. या आधी जानेवारी महिन्यातही ट्रम्प यांनी मोदींची नक्कल केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हार्ले डेव्हिडसनवरच्या करामुळे ट्रम्प नाराज


डोनाल्ड ट्रम्प हे व्हाईट हाऊसमधून अमेरिकेच्या सर्व राज्यांच्या गव्हर्नरांना मार्गदर्शन करत होते. या वेळी त्यांनी हार्ले डेव्हिडसनच्या दुचाकी आयात करताना भारत लावत असलेल्या करावरून टीका केली. ते म्हणाले आम्ही शिष्पक्ष व्यापारी व्यवहार करू इच्छितो. हाल्ले डेव्हिडसन जेव्हा भारताला दुचाकी निर्यात करतो तेव्हा, १०० टक्के कर द्यावा लागतो. यावर मी जेव्हा मोदींसोबत यावर चर्चा केली तेव्हा त्यांनी करात ५० टक्के सवलत देण्याचे म्हटले होते. पण, अद्याप तरी याबाबत कोणताही बदल दिसत नाही.



मोदी सुंदर व्यक्तिमत्व - ट्रम्प


ट्रम्प यांनी पुढे मोदींशी फोनवर झालेल्या चर्चेचाही दाखला दिला. ते म्हणाले की, करात कपात करण्याबाबत त्यांनी मला अत्यंत सुंदर पद्धतीने सांगितले. नरेंद्र मोदी हे एक सुंदर व्यक्तिमत्व असल्याहेही ट्रम्प यांनी म्हटले.