मुंबई : भारत हा एक मोठा देश आहे. या देशात प्रत्येक मोठ्या शहरातील सूर्य उगवण्याची वेळ वेगवेगळी आहे. पण या आपल्या देशात सकाळी सर्वात आधी सूर्यकिरण कोणत्या गावात पडतात हा देखील कुतुहलाचा विषय आहे. भारतातील उत्तर पूर्व राज्यात सर्वात आधी सूर्यदर्शन होतं हे सर्वांना ज्ञात आहे. सूर्यकिरण सर्वात आधी पडणाऱ्या या राज्यांना सेव्हन सिस्टर्स असं देखील म्हणतात.


मनमुराद  नैसर्गिक सौंदर्य


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण सर्वात आधी सूर्यकिरण देशात कुठे पडतात हा प्रश्न महत्वाचा आहे. तर अरूणाचल प्रदेशात एक गाव आहे, या गावात सर्वात आधी सूर्यकिरण पडतात. या गावाचं नाव आहे, दोंग/दांग. मनमुराद  नैसर्गिक सौंदर्य असलेलं हे एक छोटंस गाव आहे. हे गाव समुद्र सपाटीपासून ४ हजार ०७० फुटांवर आहे. सकाळी म्हणजे आपल्यासाठी पहाटे ४ ला या ठिकाणी सूर्योदय होतो.


डोंगराच्या माथ्यावर सूर्यदर्शनाचा आनंद


देश-विदेशातून लोक येथे सूर्याची सर्वात पहिली किरणं पाहण्यासाठी येतात. या देशात एका डोंगराच्या माथ्यावर उभं राहून लोक सूर्यदर्शनाचा आनंद घेतात.


भारत, चीन आणि म्यानमार सिमा जुळतात


लोहित आणि सती नदीच्या जंक्शनवर हे गाव आहे, जेथे भारत, चीन आणि म्यानमार या देशाच्या सिमा जुळतात. या गावची लोकसंख्या म्हणजे ३५ नागरिक. येथे  झोपडीत राहणारी ही ३-४ कुटूंब आहेत.



या जमिनीवर १९६२ चं भारत-चीन युद्ध


दोंग गावाला जाताना तुम्ही वलोंगपासून पायी चालत जवळजवळ ९० मिनिटात पोहचू शकतात. वलोंगच्या जमिनीवर १९६२ चं भारत-चीन युद्ध झालं होतं. येथेच तुम्हाला थांबवण्यासाठी गेस्ट हाऊस मिळू शकतं.


१९९९ मध्ये माहित झालं की या गावात सूर्याची किरणं सर्वात आधी पडतात. याआधी मानलं जात होतं की, अंदमानच्या कटचस भागात सर्वात आधी सूर्यादय होतो.