मुंबई : देशात कोरोना व्हायरसच्या (Coron virus) ओमिक्रॉन (Omicron) प्रकाराची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. वाढत्या धोक्याच्या वेळी लोक ख्रिसमस (Christmas) आणि नवीन वर्ष  (New year) साजरे करण्याच्या तयारीत आहेत. कोविड तज्ञांचे (covid 19 experts) म्हणणे आहे की, यावेळी घरी राहून उत्सव साजरा करणे चांगले आहे. ख्रिसमस किंवा नवीन वर्षाच्या दिवशी लोकांनी एकत्र पार्ट्या केल्या तर येत्या काळात धोका अधिक वाढू शकतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS), नवी दिल्लीचे कोविड तज्ज्ञ युधवीर सिंग यांनी म्हटले की, Omicron खूप वेगाने पसरत आहे. हे लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना देखील संक्रमित करत आहे. जो धोक्याचा संकेत आहे. अशा परिस्थितीत, ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पार्ट्या या प्रकारासाठी सुपर स्प्रेडर बनू शकतात. त्यामुळे पुढील काही आठवड्यात ओमिक्रॉनची प्रकरणे झपाट्याने वाढू शकतात. त्यामुळे यावेळी लोकांनी ख्रिसमस आणि नवीन वर्ष घरच्या घरी साजरे करणे गरजेचे झाले आहे. जर तुम्ही कोरोनापासून दूर राहिलात तर तुम्हाला नंतरही सेलिब्रेट करण्याची संधी मिळेल.


लक्षणे सौम्य आहेत परंतु तरीही धोका


डॉ युधवीर सांगतात की, या प्रकाराची लक्षणे जरी सौम्य असली तरी आपला देश दाट लोकवस्तीचा आहे. जर हा प्रकार वेगाने पसरू लागला तर रुग्णांची संख्या विक्रमी पातळीवर वाढू शकते. अशा स्थितीत दोन टक्के लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज भासली तरी त्यामुळे आरोग्याच्या पायाभूत सुविधांवरील भार वाढू शकतो. आधीच वेगवेगळ्या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना या प्रकाराची लागण झाली असेल तर त्यांची प्रकृती बिघडण्याचा धोका आहे. म्हणून, वेरिएंटचा प्रभाव सौम्य आहे असे समजू नका, परंतु त्यापासून स्वतःचे संरक्षण करण्यावर लक्ष केंद्रित करा.


कोविड तज्ज्ञ डॉ. अजय कुमार म्हणतात की, कोरोनाच्या कोणत्याही प्रकारापासून संरक्षण करण्यासाठी सर्वात मोठे शस्त्र हे मास्क आहे. त्यामुळे लोकांनी मास्क वापरावेत. महत्त्वाचे काम नसेल तर घराबाहेर पडू नका. गर्दीच्या ठिकाणी जसे की मार्केट, मॉल्स, पार्ट्या आणि इतर कोणत्याही कार्यक्रमात जाऊ नका. ज्या लोकांना अद्याप कोरोनाची लस मिळालेली नाही. त्यांचे शक्य तितक्या लवकर लसीकरण करणे आवश्यक आहे. यामुळे संसर्ग झाला तरीही गंभीर लक्षणे उद्भवणार नाहीत.


Omicron ची लक्षणे


दिल्लीतील लोकनायक रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ सुरेश कुमार यांनी सांगितले की, आतापर्यंत ओमिक्रॉनचे रुग्ण रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यापैकी सर्वात सामान्य लक्षण म्हणजे घसा खवखवणे. संसर्ग झालेल्यांपैकी काहींना सौम्य खोकला आणि सर्दीचीही तक्रार होती. याशिवाय थकवा आणि ताप ही देखील या प्रकाराची लक्षणे आहेत.