नवी दिल्ली : काँग्रेसला डबल धक्का बसलाय. गुजरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरसिंह वाघेला यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलीय. तर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या अंबिका सोनी यांनी काँग्रेसमधील पदांचा राजीनामा दिलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या तरी आपण काँग्रेस सोडली नसून काँग्रेसनेच 24 तासांपूर्वी पक्षातून आपल्याला काढून टाकल्याचं शंकरसिंह वाघेला यांनी म्हटलं होतं. मात्र अखेर स्वतःला आपण काँग्रेसपासून मुक्त करत असल्याची घोषणा करत राजीनाम्याची घोषणा केलीय.


राजकारणातून आपण निवृत्ती घेणार नसल्याचंही वाघेला यांनी स्पष्ट केलंय. कोणत्याही पक्षात जाईन मात्र भाजपमध्ये जाणार नसल्याचंही वाघेला यांनी सांगितलंय. दुसरीकडे हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या प्रभारीपदाचा राजीनामा दिलाय. आरोग्याच्या कारणांमुळे या पदांच्या जबाबादारीतून मुक्त करा अशी विनंती सोनी यांनी पक्षनेतृत्वाला केलीय.