Crime News : वडिलांनी पत्नी आणि मुलीची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास संजय पाल या रिक्षा चालकाने पत्नी रेखा पाल आणि मुलगी ताशूची हत्या केली. (Dout of extra marital affairs) दोघांमध्ये काही गोष्टीवरून भांडण झाले, त्यानंतर पतीने रागाच्या भरात पत्नी आणि 14 वर्षांच्या मुलीची फावड्याने हत्या केली. (Dout of extra marital affairs auto driver finish family Marthi Crime News)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकं काय आहे प्रकरण? 
गुरुवारी रात्री संजय पाल त्यांच्या घरात होता, पत्नी आणि मुलगी एकट्या होत्या. रात्री 11:30 वाजता संजयचं बायकोसोबत भांडण होतं त्यानंतर तिघेही वेगवेगळ्या खोलींमध्ये जावून झोपतात. मात्र पहाटे चार वाजता संजयला जाग आल्यावर तो बायकोच्या खोलीमध्ये जातो. तिला तू कोणाला भेटायला गेली होतीस असं विचारतो, त्यावेळी ती काही न बोलता शांत राहते. 


संजय बायकोला मारण्याची धमकी देतो त्यावेळी संतापलेली बायको त्याला कानाखाली मारते. संजयला राग येतो त्यानंतर तो बायकोला मारतो आणि पोटच्या मुलीलाही संपवून टाकतो. पत्नीचं कोणासोबत तरी अफेअर असल्याचा संशय संजयला होता. त्याने सांगूनही ती कोणालातरी भेटायला जाते आणि यामध्ये मुलगीही त्याला साथ द्यायची, मग रागामध्ये त्याने मुलीलाही संपवलं. 


पोलिसांनी सांगितलं की, संजय या रिक्षाचालकाला त्याची पत्नी आणि मुलीचे इंस्टाग्राम प्रोफाइल पाहिल्यानंतर अधिक संशय आला. पत्नी रेखाचे 959 फॉलोअर्स होते आणि तिची मुलगी ताशूचे इंस्टाग्रामवर 1255 फॉलोअर्स होते.