गोरखपूर : गोरखपूर येथील बीआरडी हॉस्पीटलच्या सर्व पदांवरून डॉ. कफील खान यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बीआरडी हॉस्पीटलला भेट दिली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. ऑक्सीजनच्या पूरवठ्याअभावी येथील हॉस्पिटलमध्ये ६०हून अधीक रूग्णांचे बळी गेले होते. या घटनेनंतर देशभरातून योगी सरकारवर टीकेचा वर्षाव होत आहे. या पार्श्वभूमीवर रविवारपासून (१३ ऑगस्ट) बीआरडी हॉस्पिटलमधील प्रशासनावर कारवाई सुरू करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉ. कफील खान हे  बीआरडीचे सुप्रिटेडेंट आणि वाईस प्रिन्सीपल होते. तसेच, त्यांच्याकडे हॉस्पीटलमधील विविध पदांचीही जबाबदारी होती. मात्र, या घटनेनंतर त्यांना सर्व पदांवरून मुक्त करण्यात आले आहे. असे असले तरी, खान यांना नेमके कोणत्या कारणावरून पदमुक्त करण्यात आले याबाबत प्रशासनाने माहिती दिली नाही. 


दरम्यान, या आधी शनिवारी (१२ ऑगस्ट) सोशल मीडिया आणि स्थानिक प्रसारमाध्यमांतून हॉस्पीटलमध्ये घडलेल्या घटनेच्या बातम्या आणि माहिती प्रसाराती झाली होती. या वृत्त आणि बातम्यांनुसार, रूग्णालयातील ऑक्सिजनचा साठा संपल्याचे लक्षात येताच खान यांनी तो उपलब्ध करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. मात्र, मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या दौऱ्यानंतर डॉ. खान यांच्यावर कावाई करण्यात आली.


दरम्यान, डॉ. खान यांच्या जागी डॉ. भूपेंद्र शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.