उत्तरप्रदेश :   काळा पैसा बाहेर काढण्याच्या उद्देशाने काही महिन्यांपूर्वी सरकारने ५०० आणि  १००० च्या नोटांवर बंदी घातली. त्याऐवजी नव्या ५०० च्या आणि २०००च्या नोटा चलनात आणल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज गणेश चतुर्थीचा मुहुर्त साधत सरकारने २०० आणि ५० च्या नोटादेखील चलनात आणल्या. नव्या नोटा एटीममध्ये उपलब्ध नसल्याने त्याची खरेदी करण्यासाठी नागरिकांना रिझर्व्ह बॅंकेसमोरही लांबच लांब रांगा लावल्या होत्या. 
लखनऊ शहरात राहणार्‍या डॉ. रईस यांना सर्वप्रथम ५० ची नोट मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. 



 


नवी ५० ची नोट जुन्या ५ च्या नोटेप्रमाणे दिसते.  फिक्कट निळ्या रंगाची ५० रूपयांची नोट ६६ मिमी x १३५ मिमी आहे. यावरही गर्व्हनर उर्जित पटेल यांची सही,  महात्मा गांधीचा फोटो आणि स्वच्छ अभियानाचा लोगो आहे.