Draupadi Murmu Oath Taking Ceremony: देशाचे 14 वे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या पदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर भारताच्या 15 व्या राष्ट्रपतींची नियुक्ती करण्यात आली. द्रौपदी मुर्मू यांची या देशाच्या 15 राष्ट्रपती ठरल्या. देशातील आदिवासी समुदायातून एखाद्या महिलेला राष्ट्रपतीपद मिळण्याची ही पहिलीच आणि गौरवाची बाब. याच पदाचा पदभार स्वीकारत द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी सकाळी 10 वाजून 15 मिनिटांनी   संसदेच्या सेंट्रल हॉल येथे राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरन्यायाधील न्यायाधीश एन.वी.रमण यांनी मुर्मू यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. शपथ ग्रहण केल्यानंतर सभागृहात उपस्थित सर्वांनीच द्रौपदी मुर्मू यांच्या नव्या प्रवासासाठी त्याना टाळ्यांच्या गजरात शुभेच्छा दिल्या. 


संपूर्ण शिष्ठाचार आणि संवैधानिक तरतुदींचं पालन करत हा सोहळा पार पडला. यावेळी देशाच्या राजकारणातील बरेच मातब्बर शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित होते. 





शपथविधीनंतरची राष्ट्रपतींची सर्वात पहिली प्रतिक्रिया राष्ट्रपतीपदावर येणं ही माझ्या एकटीचं यश नाही. हे देशातील प्रत्येक गरीब व्यक्तीचं यश आहे. माझं इथं असणं हीच बाब दर्शवतं की, देशातील गरीब फक्त स्वप्नच पाहत नाहीत तर त्यांची स्वप्न साकारही होतात. आपल्या या पदामागे प्रत्येक गरीबाचा आशीर्वाद आहे, असं राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या.