Driving Licence बनवताना सावधगिरी बाळगा, ही चूक केली तर पैसे भरल्यानंतरही होणार नाही काम
आजकाल प्रत्येक जण स्वतःच्या वाहनाने प्रवास करण्याला प्राधान्य देत आहे. त्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) आवश्यक असते. तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.पण...
मुंबई : Online Fraud: आजकाल प्रत्येक जण स्वतःच्या वाहनाने प्रवास करण्याला प्राधान्य देत आहे. त्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) आवश्यक असते. तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. काही ठग याचा गैरफायदा घेऊन लोकांना त्यांचे बळी बनवतात. वास्तविक, ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) बनवणाऱ्या अधिकृत वेबसाईट सारख्या बनावट वेबसाइट्स इंटरनेटवर सक्रिय आहेत. या बनावट वेबसाइट परवाने बनवण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक करतात.
3300 लोक ऑनलाइन फसवणुकीचे बळी
ऑनलाईनच्या माध्यमातून अनेक प्रकारचे लुटमार करणारे आणि त्यांचे काळे कारनामे करत राहतात. त्याचप्रमाणे, गाझियाबादच्या राजनगरमध्ये राहणाऱ्या 30 वर्षीय कपिल त्यागी याने 3300 लोकांची ऑनलाईनच्यामाध्यमातून फसवणूक केली. रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाला याबाबत माहिती मिळाली तोपर्यंत कपिल त्यागीने 70 लाखांहून अधिक कमाई केली होती.
परिवहन मंत्रालयाची सायबर सेलमध्ये तक्रार
परिवहन मंत्रालयाचे संचालक पियुष जैन यांनी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या सायबर सेलकडे तक्रार दाखल केली, त्यानंतर तपासात उघड झाले की बहुतेक लोकांनी ड्रायव्हिंग लायसन्स गुगलवर शोधले. e-parivahanindia.online, www.roadmax.in आणि Sarathiparivahan.com नावाच्या वेबसाईट्सची लिंक सर्च इंजिनच्या वरच्या बाजूस येत असे, वास्तविक सरकारी वेबसाईट गृहीत धरून, पीडित लोक त्यावर त्याचे तपशील भरून पैसे भरत असत. पैसे देऊनही त्यांचे काम झाले नाही, तेव्हा लोकांनी परिवहन मंत्रालयाकडे तक्रार केली. त्यानंतर हा प्रकार उघड झाला.
ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन्स फसवणूक
Online Driving License Fraud - सायबर सेलने त्या चोरट्याला अटक केली. सतत तक्रारी आल्यानंतर सायबर सेलचे डीसीपी केपीएस मल्होत्रा यांनी एसीपी रमण मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखाली एक टीम तयार केली. या फसवणुकीचा मास्टर माइंड कपिल त्यागी आहे, असे सायबर सेलने अटक केल्याचे तपासात उघड झाले. पोलीस तपासात उघड झाले की कपिलने त्याच्या वेगवेगळ्या बँक खात्यात पैसेही ट्रान्सफर केले होते.
खऱ्या आणि बनावट वेबसाइट अशा ओळखा
दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलचे डीसीपी केपीएस मल्होत्रा यांनी 'झी न्यूज'ला सांगितले की, लोकांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की ऑनलाईन सर्च करताना सरकारी वेबसाइटच्या शेवटी .Gov.in आहे. या व्यतिरिक्त, जर कोणतीही वेबसाइट समान नावाने येत असेल तर लोकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
सायबर सेलने आरोपी कपिलकडून 10 चेकबुक, 15 सिम कार्ड, 4 मोबाईल फोन, 3 लॅपटॉप, 2 पेन ड्राइव्ह, 2 हार्ड डिस्क, 15 डेबिट आणि क्रेडिट कार्डसह सुमारे साडेआठ लाख रुपये जप्त केले आहेत.