मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. यामध्ये काही व्हिडिओ हे मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडिओ हे खुपच शॉकिंग असतात. असाच एक शॉकिंग व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ड्रग्ज तस्करीचा भांडाफोड झाल्याचे दिसत आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.  


व्हिडिओत काय? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल व्हिडिओत (Viral Video) एक नवरी मुलगी लग्नाची निमंत्रण पत्रिका (Wedding Card) घेऊन जात आहे. या लग्न पत्रिकेची एअरपोर्टवर तपासणी केली असता, त्यामध्ये ड्रग्ज आढळते. विशेष म्हणजे ही लग्न पत्रिका (Wedding Card) पाहुन कुणालाही देखील वाटलं नसेल की त्यात ड्रग्ज असेल. मात्र एअरपोर्टवरच्या पोलिसांनी ज्यावेळेस ती लग्न पत्रिका पुर्ण उघडून पाहिली त्यावेळेस त्यांना त्यात ड्रग्ज सापडले आहे. पोलिसांनी हे ड्रग्ज ताब्यात घेतले आहे. 



विशेष म्हणजे अशा प्रकारची ड्रग्ज तस्करी (Drugs Case) कधीच समोर आली नव्हती. पोलिसही ही तस्करी पाहून चक्रावले आहेत. या संदर्भातला हा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे. हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला असून, हा व्हिडिओ 2 वर्ष जुना असल्याचे सांगण्यात येत आहे.


हा व्हिडिओ पाहून नेटकरी देखील चक्रावले आहेत. त्यांनी अशाप्रकारची तस्करी (Drugs Case) पाहून आश्चर्य व्यक्त केले आहे.दरम्यान हा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होत आहे.