नवी दिल्ली : 2020 पर्यंत देशामध्ये स्वस्त औषधांची 2,500 आणि जन औषधी दुकाने उघडली जाणार असल्याचे केंद्र सरकारतर्फे बुधवारी सांगण्यात आले. सध्या अशा प्रकारची 5 हजार दुकाने सुरू आहेत. प्रत्येक भागात कमीत कमी एक दुकान उघडण्याची योजना सरकारने तयार केली आहे. यामध्ये लोकांना कमी दरात चांगली औषधे उपलब्ध होणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


जन औषधी केंद्रांची संख्या 5 हजारच्या वर गेली आहे. 2020 पर्यंत देशभरात पंतप्रधान 'भारतीय जनऔषधी योजने' अंतर्गत 2,500 हून अधिक केंद्र उघडण्यात येतील असे केंद्रीय केमिकल्स मंत्री मनसुख एल मांडविया यांनी सांगितले. प्रत्येक विभागात कमीत कमी एक जन औषधी दुकान असावे याकडे आमचे लक्ष्य असल्याचेही ते म्हणाले. 


गरजेची औषधे नागरिकांनी जवळच्या जन औषधी केंद्रातून खरेदी करावी असे आवाहान यावेळी मंडाविया यांनी केले. या केंद्रातून इतरांच्या तुलनेत औषधे स्वस्त मिळतात, याचा फायदा जनतेला मिळतो असे त्यांनी यावेळी सांगितले. 



घरामध्ये एखादा रुग्ण असेल तर त्याच्या उपचारासाठी साधारण 70 टक्के पैसे खर्च होत असतात. सामान्य गुणांच्या औषधांची मागणी वाढत आहे. जन औषधी केंद्रात दररोज 10 ते 15 लाख लोक औषधे घेत असल्याचेही त्यांनी सांगितले. पंतप्रधान भारतीय जन औषधी परियोजने अंतर्गत उघडण्यात येणाऱ्या या दुकांनांमध्ये 800 हून अधिक प्रकारची औषधे उपलब्ध होणार आहेत. यासोबतच ऑपरेशवेळी उपयोगी येणारे 154 चिकित्सेचे सामान देखील उपलब्ध होणार आहे.