देशातील टोल वसुलीला स्थगिती, केंद्रीय परिवहन मंडळाचा निर्णय
![देशातील टोल वसुलीला स्थगिती, केंद्रीय परिवहन मंडळाचा निर्णय देशातील टोल वसुलीला स्थगिती, केंद्रीय परिवहन मंडळाचा निर्णय](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_500x286/public/2020/03/26/375843-768570-nitin1.jpg?itok=yYHhQv-N)
या निर्णयानुसार १४ एप्रिल पर्यंत टोलवसूली स्थगित
नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. या पार्श्वभुमीवर केंद्रातर्फे अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. याच पार्श्वभुमीवर केंद्रीय परिवहन विभागाने एक महत्वाचा निर्णय जाहीर केलाय. या निर्णयानुसार १४ एप्रिल पर्यंत टोलवसूली स्थगित करण्यात आली आहे.
देशभरात कोरोनाचे सावट घोंघावत असताना केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा हा निर्णय महत्वाचा मानला जातोय. देशभरातील टोल वसुली तात्पुरती स्थगित करण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.
कोरोनामुळे अत्यावश्यक सेवांना अडसर निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं गडकरी यांनी सांगितले आहे.
मजुरांना १० कोटी ?
केंद्र सरकारतर्फे सामान्य मजूर, छोटा शेतकरी, असंघटित कामगारांसाठी दिलासादायक बातमी आहे. कोरोनामुळे व्यवसाय थंड झाल्याने मजूर आणि कामगारांवर संकट कोसळलंय.
मोदी सरकार १० कोटी लोकांच्या खात्यात थेट पैसे जमा करणार असल्याचं समजतंय.
यासाठी दीड लाख कोटींचं पॅकेज घोषित करणार असल्याचं सांगण्यात येतंय. सरकारने तूर्त अंतिम घोषण केलेली नाही.
पंतप्रधान कार्यालय, अर्थमंत्रालय आणि रिझर्व बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चेनंतर लवकरच ही घोषणा होण्याची शक्यता आहे.