Crime News : गुण्यागोविंदाने संसार सुरू असताना पतीच्या डोक्यात संशयाचं भूत शिरलं त्यानंतर सर्व काही संपवून टाकलं. ही घटना राजस्थानच्या डूंगरपूर जिल्ह्यातील आहे. पती आणि पत्नीचं झालेलं भांडण इतकं टोकाला पोहोचलं की पतीने आपल्या धर्मपत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जितेंद्र बरंडा असं आरोपी पतीचं नाव आहे. (Husband kills Wife)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकं काय आहे प्रकरण 
आरोपी जितेंद्रला पत्नी अनितावर काही दिवसांपासून संशय येत होता. त्यामुळे त्याचे पत्नीसोबत कोणत्या ना कोणत्या कारणावरून त्याचे खटके उडत होते. एक दिवस रात्री जितेंद्र झोपला होता, त्याला जाग आली तेव्हा पत्नी घरात नव्हती. काही तासांनी पत्नी घरी परतली मात्र इतका वेळ कुठे होती यावरून दोघांमध्ये मोठा वाद झाला. 


खुरप्याने केली हत्या
दोघांमधील वाद इतका वाढला की जितेंद्रने खुरपं घेतलं आणि पत्नीच्या डोक्यात मारलं. जितेंद्रने इतक्या जोरात घाव घातला होता की त्याच्या पत्नीचा जाग्यावरच मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे त्याने दोन्ही मुलांसमोर पत्नीची हत्या केली. आईची झालेली हत्या पाहून मुलांनी जोरजोरात रडायला सुरूवात केली. 


मुलांच्या रडण्याच्या आवाजामुळे शेजारचे लोक जमा झाले. त्यावेळी अनिताचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. मुलांना शेजारच्यांनी विचारल्यावर, आई- वडिलांमध्ये भांडण झालं आणि वडिलांनी आईला मारल्याचं त्यांनी सांगितल. 


पत्नीला संपवत आरोपी पती पोलीस ठाण्यामध्ये गेला. मी पत्नीची हत्या केल्याचं जाऊन सांगितलं. पोलिसांनी जितेंद्रला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.