नवी दिल्ली :  दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी संघाच्या यंदाच्या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेस (अभाविप) पराभवाचा सामना करावा लागला आहे. वादग्रस्त ठरलेल्या तीनही जागांवर एनएसयूआयने बाजी मारली असून, अध्यक्षपदही मिळवले आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एनएसयूआयच्या रॉकी तुसीदने अभाविपच्या रजत चौधरीला पराभूत केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एनएसयूआय (भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटना) ही कॉंग्रेस समर्थीत विद्यार्थी संघटना आहे. एनएसयूआयने २०१२ नंतर तीन जागांवर विजय मिळवला आहे. विद्यार्थी संघाच्या निवडणुकीसाठी काल (मंगळवार, १२ सप्टेंबर) मतदान झाले होते. त्याचा आज (बुधवार, १३ सप्टेंबर) निकाल लागला. एकूण १य३२ लाख विद्यार्थ्यांमधून ४२.८ टक्के विद्यार्थ्यांनी मतदान केले. किंग्जवे नजीक असलेल्या समुदाय भवनमध्ये मतमोजणी पार पडली. गेल्यावर्षी एकूण चार जागांपैकी अभाविपने तीन जागा जिंकल्या होत्या.


दरम्यान, या निवडणुकीच्या निमित्ताने अभाविपला चांगलाच झटका मिळाला आहे. महत्त्वाचे असे की, २०१५ला झालेल्या निवडणुकीत अभाविपने चारही जागांवर विजय मिळवला होता. तर, कॉंग्रेस समर्थित एनएसयूआयने २००७ मध्ये सर्व जागांवर विजय मिळवला होता.