नवी दिल्ली : भारताच्या 6 राज्यांमध्ये बुधवारी 5 तासात भूकंपाचे हादरे बसले आहेत. बिहार, आसम, झारखंड, हरियाणा, पश्चिम बंगाल आणि जम्मू-काश्मीरच्या अनेक भागांमध्ये भूकंपाचे झटके जाणवले. भूकंपाचे हादरे जाणवल्यानंतर लोकं घरातून बाहेर पळून आले. अनेकांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण आहे. पण या घटनेत कोणत्याही जीवीतहानीची माहिती पुढे आलेली नाही.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जम्मू आणि काश्मीरमध्ये बुधवारी 4.6 रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद झाली. सकाळी 5.15 मिनिटांनी हे हादरे जाणवले. भूकंपाचं केंद्र लद्दाख येथून 199 किलोमीटरवर होतं.



बिहारच्या मुंगेर, भागलपूर, अररिया, पूर्णिया, बाढ, पटना, फारबिसगंज, मधेपुराच्या उदाकिशुनगंज, मुरलीगंज या ठिकाणी देखील भूकंपाचे झटके जाणवले. झारखंडच्या हजारीबागमध्ये देखील हादरे जाणवले. दोन दिवसांपूर्वी राजधानी दिल्लीत देखील भूकंपाचे झटके जाणवले होते. मेरठ आणि हरियाणा सीमेजवळ याचं केंद्र होतं.