मुंबई : भूकंपनाच्या तीव्र धक्क्याने राजस्थानमधील बिकानेर हादरले. येथे भूकंपाचे तीव्र धक्के (Earthquake in Bikaner) जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.3 नोंदविली गेली आहे. नॅशनल तेंटर फॉर सिस्मोलॉजीने सांगितले की, हे भूकंप पहाटे 5:24 वाजता बीकानेरमध्ये झाला. भूकंपामुळे आतापर्यंत कोणतेही नुकसान झालेले नाही.


मेघालय-लडाखमध्येही पृथ्वीला हादरे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थान आधी मेघालयमध्ये रात्री 2.10 वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे जोरदार धक्के बसले. ज्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.1 नोंदविण्यात आली. अहवालानुसार, भूकंपाचे केंद्रबिंदू पश्चिम गॅरो हिल्स येथे होते. परंतु अद्यापपर्यंत मेघालयातही कोणाचेही नुकसान झाले नसल्याचे वृत्त आहे. त्याशिवाय लेह-लडाख भागातही पहाटे 4.57 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले, ज्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.6 होती.



भूकंप का होतो?


पृथ्वीच्या आत 7 प्लेट्स आहेत, ज्या सतत फिरत असतात. जेथे या प्लेट्स अधिक टक्कर घेतात, त्या झोनला फॉल्ट लाइन म्हणतात. वारंवार होणाऱ्या टक्करांमुळे प्लेट्सचे कोपरे वाकलेले असतात. जेव्हा जास्त दाब वाढतो आणि प्लेट्स तुटतात. त्याचवेळी खाली ऊर्जा बाहेर येण्याचा मार्ग शोधते. मग यानंतर भूकंप होतो.



कधी किती भूकंपनाचा धोका असतो?


रिक्टर स्केल प्रभाव
0 ते 1.9 हे फक्त सिस्मोग्राफवरून ओळखले जाते
2 ते 2.9 सौम्य कंप.
3 ते 3.9 जर एखादा ट्रक आपल्या जवळून गेला तर असा परिणाम.
4 ते 4.9 खिडकी तुटू शकतात. भिंतींवरील टांगलेल्या फ्रेम्स कोसळू शकतात.
5 ते 5.9 फर्नीचर जोरदार हलते
6 ते 6.9 इमारतींचे पाया तुटू शकतात. वरच्या मजल्यांचे नुकसान होऊ शकते
6 ते 6.9 इमारचे मोठे नुकसान होऊ शकते. वरच्या मजल्यांना धोका पोहोचतो. 
7 ते 7.9 इमारती कोसळू शकतात. जमिनीतील पाईप फुटू शकतात.
8 ते 8.9 इमारतीबरोबर मोठे पूल कोसळू शकतात. त्सुनामी येऊ शकते.
9 आणि त्या पेक्षा जास्त पूर्ण नाश. जर कोणी शेतात उभे असेल तर पृथ्वी तरंगताना दिसेल. जर समुद्र जवळ असेल तर त्सुनामी पाहायला मिळेल.