नवी दिल्ली : देशात भूकंपाचे धक्के बसण्याचा क्रम सुरुच आहे. गुजरातच्या राजकोटमध्ये मध्यम दर्जाच्या भूकंपाची नोंद झाली आहे. त्यानंतर काही वेळेतच आसामच्या करीमगंज भागात भूकंपाचे धक्के जाणवले. याआधी गुरुवारी हिमाचल प्रदेशच्या उना येथे भूकंपाचा हादरा बसला होता. सध्या कोणत्याही हानीची माहिती पुढे आलेली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजकोटमध्ये आज सकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला. रिक्टर स्केलवर भूकंपची तीव्रता 4.5 इतकी होती. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोकं घराच्या बाहेर पडले. त्यानंतर काही वेळेतच करीमगंजमध्ये ही भूकंपाचे धक्के जाणवले. 7 वाजून 57 मिनिटांनी भूकंपाचे धक्के येथे जाणवले. ज्याची तिव्रता ही रिक्टर स्केलवर 4.1 इतकी होती.



पहाटे हिमाचल प्रदेशातील उना येथे भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्या माहितीनुसार हिमाचल प्रदेशच्या उना येथे पहाटे 04 वाजून 47 मिनिटांनी भूकंपाचे हादरे बसले. रिश्टर स्केलवर 2.3 तीव्रतेचा हा भूकंप होता. भूकंपामुळे जीवितहानीची कोणतीही माहिती आलेली नाही.