Easy and affordable home decoration tips and trick : येता महिना सणवारांचा महिना आहे. अशात आपण सर्वजण सणासुदीच्या दिवसांत आपलं घर स्वच्छ तर करतोच. मात्र गणपती ( Ganesh Festival ) किंवा दिवाळीआधी ( Diwali )आपण घरात लहानसहान बदलही करतो. ज्यामुळे आपल्या घरात पॉझिटिव्ह एनर्जी (Positive Energy ) येते. अशात या बातमीतून आम्ही तुम्हाला घर सजवण्याच्या काही भन्नाट टिप्स देणार आहोत. 


घराचा मुख्य दरवाजा कसा सजवाल?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरुवात करूयात घराच्या मुख्य दरवाज्यापासून. सणासुदीच्या दिवसांमध्ये घरातील मुख्य दरवाजा छान सजवायला हवा. यासाठी तुम्ही पारंपरिक झेंडूच्या फुलांची आणि आंब्याची पानं असलेलं तोरण वापरू शकतात. याच्या आसपास लाइटिंग  देखील करू शकतात. मुख्य दरवाजा सजावल्याने येणाऱ्या जाणाऱ्यांनाही प्रसन्न वाटतं.  


घरातील पडदे आहेत महत्त्वाचे


सणासुदीच्या दिवसात खास पडद्यांची निवड करा. आजकाल बाजारात विविध प्रकारचे पडदे उपलब्ध आहेत. तुम्ही मिक्स अँड मॅच करून पडद्यांची सेटिंग करू शकतात. 


फुलांचं डेकोरेशन देईल फ्रेशनेस 


घरातील दरवाजापासून ते देवघर सजवणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच घरात फुलांचा सुवास दरवळत राहणं महत्त्वाचं आहे. घरातील कोपऱ्यांमध्ये तुम्ही फुलाचे गुच्छ ठेऊ शकतात. घरांच्या कोपऱ्यात सोनचाफ्याची फुलं ठेवल्यास घरात छान सुवास पसरतो. 


पूजेचं ताट सजवणं 


सणांमध्ये आपण विविध देवांची पूजा करतो. यासाठी पूजेचं ताट तुम्ही उत्तम सजवू शकतात. पूजेच्या थाळीला कलर्सने तुम्ही रंगवून त्यावर फुलांची सजावट करू शकतात. पूजेच्या थाळीला फॅन्सी लूक देण्यासाठी तुम्ही लहान डब्यांचा वापर करू शकतात सोबतच कापूर आणि तांदळाच्या दाण्यांनी तुमची पूजेची टाळी उठून दिसेल. 


चांगली आसन व्यवस्था 


तुम्ही घरांमध्ये सण तेंव्हाच एन्जॉय करू शकतात जेंव्हा तुमच्या घरातील आसन व्यवस्था कम्फरटेबल असेल. त्यामुळे आसन व्यवस्थेला विसरू नका. तुम्ही कुशन आणि लोड चा वापर करून तुमची  आसन व्यवस्था अधिक चॅन आणि कम्फर्टेबल करू शकतात. पडदे आणि घरातील रंगसंगतीप्रमाणे तुम्ही यामध्ये बदल करू शकता. 


affordable home decoration tips, home decor tips, easy home decor tips, quick home decor tips, home decoration tips for festive, festival home decoration tips 


easy and affordable home decoration tips for festive season