Monsoon : पावसाळा सर्वांचाच आवडता ऋतू आहे. पण पावसाळयात सर्दी, ताप आणि पचनाशी संबंधित समस्यांचा धोका वाढतो. बदलत्या हवामानाचा आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो, ज्यामुळे आपल्याला फ्लू, सर्दी, ताप, ऍलर्जी आणि संक्रमण होण्याची शक्यता असते. जर तुम्हाला रिमझिम पावसाचा कोणताही त्रास न होता आनंद घ्यायचा असेल तर काही औषधी वनस्पतींशी मैत्री करणे चांगले तुम्हाला उपयोगी ठरेल पावसाळ्यात फ्लू, सर्दी, ताप, ऍलर्जी, इन्फेक्शनचा धोका वाढतो. जर तुम्हाला पावसाचा आनंद घ्यायचा असेल आणि कोणताही त्रास टाळायचा असेल तर काही आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचा वापर करणे उपयोगी ठरते. चला तर या आयुर्वेदिक वनस्पतींबद्दल जाणून घेऊया.


कोणत्या औषधी वनस्पतींचे सेवन करायला हवे? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अश्वगंधा : अश्वगंधाचे सेवन केल्यानं आपल्याला खोकल्यापासून सुटका मिळते. अश्वगंधाचे सेवन केल्यास स्टॅमिना वाढतो आणि शांत झोपही लागते. कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास अश्वगंधा मदत करते. अश्वगंधा मलेरियाविरोधी गुणधर्मांसाठीही ओळखली जाते.


त्रिफळा: त्रिफळा हे आवळा, बिभीतकी किंवा बेहडा आणि हारीतकी किंवा हरड या सगळ्या प्रमुख औषधी वनस्पतींचे मिश्रण आहे. या चूर्णाच्या सेवनाने आपली पचनक्रिया मजबूत होते. आवळा, व्हिटॅमिन सी नं भरपूर, सर्दी आणि खोकल्याचा प्रभाव कमी करण्यास मदत करतो. बेहडा हे खोकल्याच्या उपचारात मदत करते आणि बद्धकोष्ठता दूर करते. हरितकी गार्गलमुळे घशाला आराम मिळतो आणि पचन सुधारते.


हेही वाचा : फीमेल प्लेजरवर Kajol स्पष्टचं बोलली; खाण्यापिण्यापेक्षाही 'या' विषयावर...


गिलॉय: गिलॉय हे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ओळखले जाते. हे संक्रमणांशी लढण्यासाठी पांढऱ्या रक्त पेशी वाढवण्यास मदत करते. गिलॉयचे सेवन केल्याने तुम्ही विविध आजारांपासून लवकर बरे होऊ शकता.


तुळस: तुळशीची पाने सर्दी आणि खोकल्यावरील घरगुती उपचारांचा एक आवश्यक भाग आहेत. तुळसमध्ये अनेक गुणधर्म आहे. तुळसच्या सेवनानं आपले अनेक आजारांपासून लांब राहतो. तुळसमुळे कफ कमी होण्यास मदत करते. तुळशीच्या पानांमुळे श्वसनाच्या आजारातही आराम मिळतो. दररोज दोन कप तुळशीच्या चहाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, स्ट्रेस लेव्हल कमी होतो आणि बॉडी डिटॉक्स होण्यास मदत होते