नवी दिल्ली : केंद्र सरकार नागरिकांना दिवाळी गिफ्ट देण्याची शक्यता आहे. सरकारने हे गिफ्ट दिलं तर रेस्टॉरंटमध्ये पार्टी करणे अधिक स्वस्त होण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारकडून जीएसटीच्या दरांमध्ये बदल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांनुसार, जीएसटी काऊन्सिलच्या पुढील बैठकीत रेस्टॉरंटमधील खाण्यावरील जीएसटीच्या दरात घट करण्याची शक्यता आहे. हा दर कमी करून १२ टक्के केला जाऊ शकतो. रेस्टॉरंटमधील जेवणावर सध्या १८ टक्के जीएसटी लागतो. 


सरकारच्या या प्रस्तावाला मंजूरी मिळाली तर नागरिकांना दिलासा मिळणार आहे. आता एसी रेस्टॉरंटमध्ये जेवण करण्यावर १८ टक्के जीएसटी लागतो. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास एसीसह नॉन एसी रेस्टॉरंटमधील खाण्यावर जीएसटीचे दर कमी होतील. असे झाल्यास इनपुटवर चुकवण्यात आलेला कर क्लेम करण्याची सुविधा सोडावी लागू शकते. 


एका अधिका-याने सांगितले की, ‘अशी माहिती मिळाली आहे की, रेस्टॉरंट आपल्या ग्राहकांना इनपुट टॅक्स क्रेडिटचा फायदा देत नाहीयेत. याच बाबतीत विचार करण्यासाठी जीएसटी काऊन्सिलची एक कमेटी तयार करण्यात आली आहे. रेस्टॉरंट मालकांनीही सर्वचप्रकारच्या रेस्टॉरंटमध्ये १२ टक्के जीएसटी लावण्याची मागणी केली होती’.