मुंबई : Economic Survey 2022 Live News : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक पाहणी अहवाल लोकसभेत मांडला. अहवालाने पुढील आर्थिक वर्ष 2022-23 (FY23) साठी GDP वाढीचा दर 8-8.5% च्या जवळपास राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. चालू आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेचा विकास दर 9.2 टक्के असण्याचा अंदाज आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक पाहणी अहवाल 2021-22 सादर केला. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये GDP वाढ 8-8.5% राहण्याचा अंदाज आहे. चालू आर्थिक वर्षात GDP वाढ 9.2% पेक्षा कमी आहे. 


अर्थमंत्री उद्या म्हणजेच 1 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजता संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. हा सर्वसाधारण अर्थसंकल्प येत्या आर्थिक वर्षातील सरकारच्या आर्थिक धोरणांची दिशा ठरवेल.


अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी  अर्थसंकल्पापूर्वी संसदेत सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे की, सर्व मॅक्रो निर्देशकांनी सूचित केले आहे की अर्थव्यवस्था आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्ज आहे. कृषी आणि औद्योगिक उत्पादन वाढीस मदत झाली आहे.


आर्थिक पाहणी अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2022 मध्ये वास्तविक GDP 9.2% पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. या कालावधीत औद्योगिक वाढ 11.8% शक्य आहे. यासह, कृषी क्षेत्रातील वाढ 3.9% पर्यंत असू शकते.


बँकांमध्ये भांडवलाची कमतरता नसल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे. सरकार आर्थिक लक्ष्य सहज साध्य करू शकते.