पिवळ्या रंगाची २० रूपयांची नवी नोट, पाहा काय नवीन आहे...
लवकरच चलनात येणार २० रूपयाची नोट...
मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) या बँकेने एक नवीन घोषणा केली आहे. आरबीआयच्या एका अहवालात अशी माहिती देण्यात आली आहे की, चलनात २० रूपयांची नोट येणार आहे. लवकरच २० रूपयांची नवीन नोट चलनात दिसणार आणि या २० रूपयाच्या नोटवर नवीन गव्हर्नर शक्तिकांत दास यांची स्वाक्षरी असणार आहे.
आरबीआयनं याआधीच दोनशे, २ हजार रुपयांच्या नवीन नोटा बाजारात आणल्यानंतर, आता १०, ५०, १०० आणि ५०० रुपयांच्या वेगवेगळ्या रंगातील नोटा चलनात आणल्या. २० रूपयांच्या नवीन नोटमध्ये रिझर्व्ह बँक फार बदल करणार आहे. आरबीआयच्या वृत्तानुसार अगोदरच्या नोटांच्या तुलनेत या नोटाचा आकार आणि रचना फार वेगळी असणार आहे.
नवीन नोटचा रंग हा हिरवा - पिवळा रंगाचा असणार आहे. या नोटेच्या मागे देशातील सांस्कृतिक वारसा असणाऱ्या वेरूळच्या गुहाचे चित्र असणार आहे. रिझर्व्ह बॅँकेने स्पष्टपणे सांगितले आहे की, महात्मा गांधी (न्यू) सीरिजच्या नवीन नोटा चलनात असणार आहे. मात्र जुन्या सीरिजनुसार सर्व नोटांचे पहिल्यासारखेच कायदेशीररित्या टेंडर करण्यात येणार आहे.
२० रूपयाच्या नवीन नोटेची विशेषता : या नवीन नोटमध्ये महाराष्ट्रातील औरंगाबादमधील असणाऱ्या वेरूळ लेण्या आणि गुहा असणार आहे. यामुळे नवीन २० रूपयांची नोट आकर्षक असणार आहे. वेरूळच्या लेण्यांना युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केले आहे.
आरबीआयच्या माहितीनुसार नवीन नोटांची पहिली खेप कानपूरच्या रिझर्व्ह बँकेच्या प्रादेशिक कार्यालयात पोहचली आहे.
वेरूळच्या गुहाची विशेषता: : वेरूळमध्ये ३४ गुहा आहेत आणि या गुहा ३० किलोमीटर पर्यंतच्या परिसरात पसरल्या आहेत. या गुफामध्ये हिंदू, बौद्ध आणि जैन धर्माचे मंदिर आहे. या गुहेत १२ बौद्ध गुहा ,१७ हिंदू गुहा तर पाच जैन धर्माच्या गुहा आहे.
या गुहा इसवी पूर्व १००० काळातील असून या मंदिराला राष्ट्रीयकूट वंशाच्या शासकांनी बनविले होते. महाराष्ट्रतील कैलाश मंदीर याच गुहामध्ये आहे. नवीन नोटचा आकार 63mmx129mm इतकी आहे. आणि लवकरच ती चलनात दिसणार आहे.