दहशतवाद्यांना पैसा पुरवण्याच्या प्रकरणात आणखी एकाला अटक
फुटीरतावादी नेता शब्बीर शाहचा जवळचा मानला जाणारा असलम वानीला ईडीने अटक केली आहे. श्रीनगरमधून टेरर फंडिंग प्रकरणात ही अटक करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : फुटीरतावादी नेता शब्बीर शाहचा जवळचा मानला जाणारा असलम वानीला ईडीने अटक केली आहे. श्रीनगरमधून टेरर फंडिंग प्रकरणात ही अटक करण्यात आली आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याच्या प्रकरणात अटकेत असलेल्या फुटीरतावादी नेता शब्बीर शाहला दिल्ली कोर्टात हजर केलं गेलं आहे. ईडीने शब्बीर शाहच्या कोठडीची मागणी केली आहे. सोबतच कोठडीमध्ये वाढ करण्याची देखील मागणी केली आहे.