Nirmala Sitharaman on ED : देशभरात विरोधी पक्षांकडून केंद्रीय तपास (central agency) यंत्रणांचा राजकीय फायद्यासाठी गैरवापर होत असल्याचा वारंवार आरोप करण्यात येत आहे. ईडी (ED), सीबीआय (CBI), प्राप्तिकर विभाग (IT)  या तपास यंत्रणांमार्फत विरोधकांवर दबाव आणला जात असल्याची तक्रार अनेक राज्य सरकारांनी केलीय. अशातच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याबाबत भाष्य केले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी शनिवारी अमेरिकेत (US) पत्रकार परिषदेत सक्तवसुली संचालनालयावर (ईडी) खुलेपणाने भाष्य केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईडी एक पूर्णपणे स्वतंत्र संस्था असे सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी म्हटलं आहे.  ईडी (ED) आणि इतर तपास यंत्रणांचा राजकारणासाठी वापर केल्याची चर्चाही चुकीच्या असे सीतारामन म्हणाल्या. त्यानंतर त्यांनी ईडीचा (ED) वापर राजकीय शस्त्र म्हणून केला जात असल्याचा आरोपही फेटाळून लावलाय. अमेरिका दौऱ्यावर असलेल्या निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांना शनिवारी वॉशिंग्टन डीसी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ईडीसंबंधी प्रश्न विचारण्यात आला होता.


 ईडी जे काही करते त्यामध्ये पूर्णपणे स्वतंत्र आहे. ही एक अशी तपास यंत्रण आहे जी गंभीर गुन्ह्यांचा तपास करते, असे सीतारामन म्हणाल्या. ईडी आणि आयकर विभागाच्या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या की, "या संस्थांचा वापर खाजगी भांडवल तसेच नागरी संस्थांसाठी केला जातो. ज्या प्रकरणात ईडी एंट्री घेते, तुम्हाला दिसेल की त्या व्यक्तीची आधीपासूनच इतर तपास यंत्रणा चौकशी करत असतात. यामध्ये सीबीआय असो किंवा इतर कोणतीही तपास यंत्रणा, पण प्रत्येक वेळी ईडीच्या कारवाईवरच भाष्य केले जाते. ईडी कधीही कोणत्याही गुन्ह्याच्या ठिकाणी पहिल्यांदा प्रवेश करत नाही. ईडी कुठेही जाते तिथे रोख रक्कम, सोने आणि दागिने जप्त करते त्यामुळे ती माध्यमांसमोर येते."


निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत G20 च्या आव्हानांबद्दलही भाष्य केले. 'आम्ही अनेक G20 सदस्यांशी चर्चा केली आहे. या चर्चेदरम्यान, आम्ही वर्षभरातील आव्हाने आणि समस्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. आम्ही या बैठकीचे अध्यक्षपद अशा वेळी घेत आहोत, जेव्हा सदस्य देश अनेक आव्हानांना तोंड देत आहेत. सर्व सभासदांना सोबत घेऊन काम करायचे आहे.सर्व शिष्टमंडळातील अधिका-यांनी काहीतरी साध्य करण्यासाठी जे रात्रभर काम केले त्याबद्दल मी त्यांचे मनापासून कौतुक करतो, असे सीतारामन म्हणाल्या.