चिनी (China) मोबाईल कंपनी शाओमीला (Xiaomi) भारत सरकारने जोरदार झटका दिला आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शाओमी गेल्या 7 वर्षांपासून गुप्तपणे भारतातून चीनला पैसे पाठवत होती. शाओमीवर चुकीच्या पद्धतीने परदेशात पैसे पाठवल्याचा आरोप आहे. शाओमी (Xiaomi) कंपनी 2014 मध्ये भारतात आली होती. शाओमीने लॉन्च झाल्याच्या एका वर्षानंतर 2015 मध्ये भारतातून चीनला पैसे पाठवायला सुरुवात केली. कंपनीने आतापर्यंत सुमारे 5551.27 कोटी चुकीच्या पद्धतीने चीनमध्ये पाठवले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल, ईडीने (ED) शाओमीवर (Xiaomi) वर 5,551 रुपयांचा आतापर्यंतचा सर्वात मोठा दंड ठोठावला आहे. कंपनीविरुद्ध फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अॅक्ट (FEMA) च्या नियमांनुसार कारवाई करण्यात आली आहे. ईडीने फेमाअंतर्गत शाओमीच्या बँक खात्यांमध्ये जमा केलेले सुमारे 5,551 कोटी रुपये गोठवले आहेत. 


ईडीने सांगितले की, शाओमीची बँक खाती फेमा कायद्याच्या कलम 37अ अंतर्गत गोठवण्यात आली आहेत. प्राधिकरणाची मान्यता मिळालेल्या भारतातील कंपनीवर झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी जप्ती आहे. यापूर्वी शाओमीच्या कार्यालयावर ईडीने छापा टाकला होता. या प्रकरणाच्या तपासात शाओमीने भारतातून चुकीच्या पद्धतीने पैसे पाठवले होते.


ईडीने शाओमी या चिनी कंपनीच्या कार्यालयांवर आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या घरांवर छापे टाकले होते. ईडीने आरोप केला आहे की शाओमीचे कार्यालय आणि अधिकार्‍यांकडे अनेक महत्वाची कागदपत्रे सापडली आहेत, ज्यामुळे भारताबाहेर चीनमध्ये पैसे हस्तांतरित केल्याचा माहिती समोर आली आहे