मोठा दिलासा! खाद्यतेलाच्या दरात घसरण, आताच साठा करुन ठेवा
खाद्यतेलाचे दर घसरले;
मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये झालेली वाढ सध्या सर्वसामान्यांना घाम फोडत आहे. इंधनाचे दर वाढल्यामुळं भाजीपाला ते अगदी तेलाच्या किंमतींवरही याचे परिणाम दिसून आले. मालवाहतुकीवर इंधन दरवाढीचे थेट परिणाम सध्या स्पष्टपणे दिसून येत आहेत. यातच आता मोठी दिलासा देणारी बातमीही समोर आली आहे.
कारण, खाद्यतेलांच्या दरांमध्ये मोठी घसरण झाल्याची माहिती समोर आली आहे. ही बातमी पाहून आता अनेकजण घरात माहागाईच्या भीतीनं तेलाची साठवण करतील असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार दिल्लीतील तेल तिलहन बाजारात सोयाबीन, पाम तेल आणि बिनोला तेलाच्या दरांमध्ये घसरण दिसून आली. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास शिकागो एक्सचेंजमध्ये 1.5 टक्क्यांची तेजी दिसून आली, याचे परिणाम पुरवठ्यावरही झाले.
सध्याच्या घडीला राईच्या तेलाचा पुरवठा वाढला आहे. ज्यामुळे प्रति क्विंटलमागे 25 रुपयांची घट झाली आहे. अभ्यासकांच्या मते देशभरात येत्या काही आठवड्यांमध्ये तेलाचे दर कमी होऊ शकतात.
फक्त राईच नव्हे, तर शेंगदाण्याच्या तेलांचे दरही घसरल्याची माहिती समोर आली आहे. बाजारात सध्या तेलाचे सध्याचे दर खालीलप्रमाणे...
शेंगदाणा- 6,725 - 6,820 रुपये
शेंगदाणा तेल मिल डिलिवरी (गुजरात) - 15,750 रुपये
शेंगदाणा रिफाईंड तेल- 2,610 - 2,800 रुपये प्रति टिन
राईचं तेल (दादरी)- 15,000 रुपये प्रति क्विंटल
तिळाचं तेल - 17,000-18,500 रुपये
सोयाबीन तेल - 15,750 रुपये
पामोलिन आरबीडी, दिल्ली- 15,350 रुपये
सोयाबीन दाना - 7,625-7,675 रुपये
सोयाबीन लूज 7,325-7,425 रुपये