CBSE Board 12th Exam 2021 : कोरोना साथीच्या दुसर्‍या लाटेमुळे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये सीबीएसई 12 वीच्या बोर्ड परीक्षेबाबत अनिश्चितता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक 1 जूनला 12 वीच्या बोर्ड परीक्षेच्या तारखांची घोषणा करू शकतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महत्त्वाचं म्हणजे परीक्षेचा कालावधी दीड तासांवरुन अर्ध्या तासांवर आणला जावू शकतो. परीक्षेत विद्यार्थ्यांना ३० मिनिटांच्या कालावधीसाठी पर्यायांसह ( ऑब्जेक्ट‍िव ) प्रश्न विचारले जातील.


राज्य मंत्र्यांसमवेत रविवारी झालेल्या बैठकीनंतर शिक्षण मंत्रालयाने 25 मेपर्यंत केंद्राच्या प्रस्तावावर सर्व राज्यांकडून अभिप्राय मागितला होता. बैठकीच्या दिवशी 32 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी (केंद्रशासित प्रदेश) सीबीएसईच्या 12 वी बोर्ड परीक्षा घेण्याच्या प्रस्तावाला पाठिंबा दर्शविला.


दिल्ली, महाराष्ट्र, गोवा आणि अंदमान आणि निकोबार या चारही राज्यांनी परीक्षा न घेण्याचे सुचविले होते. या राज्यांनी CBSE परीक्षेपूर्वी विद्यार्थी आणि शिक्षकांना लसीकरण करण्याची मागणी केली होती. या व्यतिरिक्त, बहुतेक राज्यांनी छोट्या स्वरूपाच्या म्हणजेच दीड तासाच्या परीक्षेवर सहमती दर्शविली आहे.


३२ पैकी जवळपास २८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी सीबीएसई परीक्षेला मान्यता दिली. केवळ राजस्थान, त्रिपुरा, तेलंगणाने पर्यायी अ म्हणजेच सध्याच्या स्वरुपात परीक्षा घेण्याचा प्रस्ताव दिला.


केंद्रीय मंत्र्यांसमवेत उच्चस्तरीय बैठकीनंतर सर्व राज्यांना बोर्ड परीक्षांवर आठवड्याभरात आपल्या सूचना देण्यास सांगण्यात आले. बहुतेक राज्ये परीक्षा घेण्यास अनुकूल आहेत आणि छोट्या स्वरूपात परीक्षा देण्यास तयार आहेत. केंद्रीयमंत्री रमेश पोखरियाल निशंक सर्व सूचनांचा विचार करून १ जून रोजी बोर्ड परीक्षांच्या नव्या तारखांची घोषणा करतील.