नवी दिल्ली : रमजानचा महिन्याभराचा रोजा ठेवल्यानंतर मुस्लिम बांधव ईदची आतुरतेने वाट बघत असतात. चंद्राचे दर्शन झाल्यानंतर भारतात ईद सोमवारी साजरी केली जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मरकजी चांद समितीचे अध्यक्ष मौलाना खालीद राशीद फिरंगी महली यांनी हि घोषणा केलीय. गेला महिनाभर देशभरात रमजानचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. 


ज्या दिवशी ईदचा चंद्र दिसतो तो रमजानचा शेवटचा दिवस समजला जातो. रमजान संपल्यानंतर ईद-उल-फितर साजरी केली जाते. रमजान हा मुस्लिम धर्मियांसाठी पवित्र सण मानला जातो. रमजानच्या कालावधीत मुस्लिम बांधव आपल्या कुटुंबियांची भेट घेऊन सणाच्या शुभेच्छा देतात.