नोएडा : मुलांवरील अत्याचारात वाढ होत असताना एकीकडे बालगुन्हेगारीही वाढताना दिसत आहे. प्रत्येकजण गुन्हेगार आहे असे नाही पण त्यांचा हट्टीपणा, आरेरावी, आक्रमकता वाढत आहे. लहान सहान गोष्टींवरून मुले टोकाची भुमिका घेताना दिसत आहेत. 


काय आहे नेमके प्रकरण?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशीच एक घटना दिल्लीत घडली. अभ्यासावरून आई ओरडली म्हणून आठवीतील एक विद्यार्थी घर सोडून पळून गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. २२ डिसेंबरला हा मुलगा घरातून पळून गेला. त्यानंतर घरातल्यांनी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीसात दाखल केली. 


तक्रार दाखल 


पोलीस ठाणे सेक्टर २४ च्या ठाणाध्यक्ष अखिलेश त्रिपाठी यांनी सांगितले की,  उत्तराखंड पब्लिक स्कूलमध्ये शिकत असलेला प्रशांत नेगी २२ डिसेंबरपासून बेपत्ता आहे. यासंदर्भात त्याच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
आई अभ्यासावरून ओरडल्यामुळे हा मुलगा घरातून पळून गेला, अशी माहिती प्राथमिक तपासणीतून समोर आली आहे. त्याचबरोबर ओरडल्यामुळे नाराज झालेला प्रशांत आपल्या आईला म्हणाला की, "मी घऱ सोडून जाईन आणि हरिद्वार येथे गंगेच्या किनारी आपले जीवन व्यतीत करेन."


तपास चालू आहे


बेपत्ता मुलाच्या आईने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे. पोलीस त्या मुलाचा तपास करत आहेत. त्याचबरोबर इतर पोलीस स्टेशनात देखील याप्रकणाची माहिती देऊन सूचित करण्यात आले आहे.