Women Pregnant Even After Sterilization: उत्तर प्रदेशमधील बांदा जिल्ह्यातील आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली आहे.  नसबंदीनंतरही चक्क 8 महिलांना पुन्हा दिवस गेले आहेत. महिलांना जेव्हा त्यांना पुन्हा दिवस गेल्याची बातमी कळाली तेव्हा काही क्षणांसाठी त्यांनाही धक्का बसला. या नंतर नागरिकांनी या प्रकरणाबाबत आरोग्य विभागाकडे  तक्रार केली आहे. या महिलांना नुकसानभरपाई म्हणून 60 हजार देण्याची तयारी प्रशासनाने दर्शवली आहे. तसंच, यासाठी त्यांच्या कागदपत्राची पडताळणी करण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताची लोकसंख्या वाढतच चालली आहे. लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. प्रशासन हम दो हमारे दो हा नाराही चालवत आहे. तसंच, सरकारकडून गर्भनिरोधक सुविधाही दिल्या जात आहेत. बऱ्याच ठिकाणी नसबंदीचे कॅम्प आयोजित करण्यात येत आहेत. यात पुरुषांपेक्षा महिला मोठ्या प्रमाणात सहभाग घेत आहेत. मात्र, बांदा जिल्ह्यात महिलांच्या नसबंदीनंतरही 8 महिला पुन्हा गरोदर राहिल्या आहेत. त्यांना गरोदर असल्याची माहिती कळताच त्या तडक आरोग्य विभागाच्या कार्यालयात पोहोचल्या आहेत. 


वैद्यकिय महाविद्यालये, जिल्हा रुग्णालयांसह अनेक सरकारी रुग्णालयांना नसबंदीसाठी टार्गेट दिलं जातं. अनेकदा नसबंदी केल्यानंतर महिलांना अश्वस्त केलं जातं. मात्र, अशाप्रकारच्या गोष्टी घडल्यास महिलांचेही मन परिवर्तन होतं व त्या नसबंदी करण्यास नकार देतात. मिळालेल्या माहितीनुसार, आरोग्य केंद्र बबेरुमध्ये तीन, बिसंडामध्ये दोन, बडोखर कमसिन आणि जिल्हा रुग्णालयात दोन महिलांची नसबंदी करण्यात आल्यानंतरही त्यांना दिवस गेले आहे. आरोग्य विभाग या महिलांची चाचणी करुन त्यांना नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया करत आहे. 


बांदा तील CMO डॉक्टर अनिल कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही एक रुटिन प्रक्रिया आहे. गेल्या वर्षात देखील अशीच प्रकरणे समोर आली होती. जेव्हा नसबंदी अयशस्वी होते तेव्हा तीन महिन्यांच्या आत नुकसान भरपाईसाठी मागणी करणे गरजेचे आहे. त्यानंतर आरोग्य विभागाकडून फाईल तयार करुन सरकारकडे पाठवली जाते. त्यानंतर महिलांना 60 हजार रुपये दिले जातात. कधी कधी लोक फक्त दावा करतात, त्यामुळं आता या महिलांची चाचणी करुन कागदपत्रांची पडताळणी करुन चौकशी केली जाईल. या घटनेला निष्काळजीपणा म्हणू शकणार नाही अनेकदा असे प्रकार समोर येतात. नसबंदीनंतरही डिफॉल्ट होऊ शकतात.