इस्लामाबाद : पाकिस्तानातील पंजाब प्रांतात एका हिंदू मंदिराची तोडफोड करण्यात आली होती. या तोडफोडीच्या प्रकारासाठी जबाबदार धरत पोलिसांनी 8 वर्षांच्या हिंदू मुलावर ईशनिंदेचा गुन्हा दाखल केला आहे. पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या कमी वयाच्या मुलावर ईशनिंदेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाक पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतलं असून त्याला मृत्यदंडाची शिक्षा होऊ शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मुलाने एका मदरशामधल्या वाचनालयात लघुशंका केली होती. यानंतर मुस्लिम कट्टरपंथीयांनी कारवाईसाठी पोलिसांवर दबाव आणला. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेऊन नंतर सोडून दिलं. मुलाची सुटका झाल्याने भडकलेल्या कट्टरपंथीयांनी हिंदू मंदिरावर हल्ला करून मंदिरांचं मोठं नुकसान केलं.


ब्रिटिश वृत्तपत्र गार्डियनने या मुलाच्या कुटुंबियांशी चर्चा केली. त्यावेळी कुटुंबियांनी आपल्या मुलावर खोटे आरोप लावल्याचं म्हटलं आहे. इतल्या लहान वयाच्या मुलाला ईशनिंदा कायदा काय असतो याची काही माहिती नाही, आपला अपराध काय आहे आणि आपल्याला तुरुंगात का ठेवण्यात आलं आहे हेसुद्धा त्याला कळत नाही. आम्ही खुप घाबरलेलो आहोत आणि आम्ही आमचं घरही सोडलं आहे. इथं राहणाऱ्या अल्पसंख्य लोकांच्या सुरक्षेसाठी सरकारने ठोस पावलं उचलायला हवीत अशी मागणीही या मुलाच्या कुटुंबियांनी केली आहे.


आतापर्यंतच्या इतिहासात एवढ्या कमी वयात ईशनिंदेचा गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच वेळ असावी. अवघ्या आठ वर्षांच्या मुलावर ईशनिंदेचा गुन्हा दाखल झाल्याने कायदेतज्ज्ञांनीही आश्चर्य व्यक्त केलं आहे. 


पाकिस्ताच्या सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं


दरम्यान, मंदिराचे संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याबद्दल पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court)  अधिकाऱ्यांना फटकारलं होतं. यानंतर 50 संशयितांना अटक करण्यात आली होती. त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मंदिराच्या दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आलं आहे.