उत्तर प्रदेश : सध्याची तरूणपिढी ही मोबाईलमध्येच बिझी आहे. मोबाईलमधल्या पब्जी, लुडो गेममागे ही पिढी व्यस्त होत चाललीय.त्यामुळे अनेकदा पालक वैतागतात. या घटनेतही वडिल संतापलेलेचं होते. मात्र संतापाच्या भरात जे वडिलांनी केले त्यामुळे संपूर्ण कुटूंब उद्ध्वस्त झालंय.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशातील आझमगडमधील रौनापर पोलीस स्टेशन परिसरात वडिलांनी आपल्याचं आठ वर्षांच्या मुलाची हत्या केल्याची घटना घडलीय. मोबाईलवर सतत लुडो खेळत असल्यामुळे संतापलेल्या पित्याने मुलाची हत्या केली. धक्कादायक म्हणजे, हत्या केली तर केलीच भावांच्या मदतीने त्याचा मृतदेहाला नदीकाठी पुरून त्याची विल्हेवाटही लावली.  


 जितेंद्र निषाद असं निर्दयी बापाचं नाव असून त्याने आठ वर्षांच्या निष्पाप लकीची हत्या केली.  तो इयत्ता दुसरीत शिकत होता. शनिवारी सायंकाळी लकी घराजवळ मोबाईलवर लुडो खेळत होता. याच गोष्टीचा राग मनात धरून जितेंद्रने मुलाला मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत लकी गंभीर जखमी झाला. तसेच लकीची प्रकृती खालावत चालली होती. आणि अचानक त्याच रात्री 9.30 च्या सुमारास लकीचा मृत्यू झाला.


मृतदेहाची लावली विल्हेवाट 
जितेंद्रने त्याचा भाऊ उपेंद्र, मुलगा श्री राम आणि चुलत भाऊ रामजन्मा यांच्यासह लकीचा मृतदेह नदीच्या काठावर पुरला. मंगळवारी सायंकाळी लकीच्या आजी व आईने माहुला पोलिस चौकीत मुलाच्या हत्येची फिर्याद दिली. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपी वडील जितेंद्रला अटक केली असून त्याच्या भावांचा शोध सुरू आहे. आईने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करून मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी आता आरोपींच्या भावांचा शोध सुरू केला असून ते अद्याप फरार आहेत. या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.