गुजरात विधानसभा निवडणूक, दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात
येत्या 14 तारखेला होणाऱ्या गुजरात विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी सर्वपक्षीय स्टार प्रचार आज गुजरातमध्ये आहेत.
अहमदाबाद : येत्या 14 तारखेला होणाऱ्या गुजरात विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी सर्वपक्षीय स्टार प्रचार आज गुजरातमध्ये आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बनसकांठा, साबंरकांठा, गांधीनगर, अहमदाबाद जिल्ह्यांमध्ये जाहीर सभा घेतील. तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह देखील चार जाहीर सभामध्ये मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करतील, तिकडे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचाही गुजरात प्रचार दौरा आजपासून पुन्हा सुरू होणार आहे.
राहुल गांधींच्या चार सभा
राहुल गांधी आज चार सभा घेणार आहेत. त्यात अहमदाबाद,आणंद, खेडा आणि छोटा उदयपूर जिल्ह्यांमधली सभांचा समावेश आहे, याशिवाय केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील प्रचाराच्या रणधुमाळीत सक्रीय राहतील
सट्टेबाजार तेजीत
गुजरातच्या निवडणूकीवर आतापर्यंत दीड हजार कोटींचा सट्टा लावण्यात आलाय. सट्टेबाजांच्या मते भाजपला पुन्हा सत्तेवर येण्याची संधी आहे. पण काँग्रेसच्या आमदारांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढण्याचा अंदाजही सट्टाबाजारात व्यक्त करण्यात येतोय.